Rajasthan : तरुणाला साप चावला, घरच्यांकडून आयसीयूमध्ये मंत्रतंत्र; डॉक्टरांनी काढली खरडपट्टी

तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलवावे लागले. उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून लपून तरुणाच्या कुटुंबीयांनी स्वत:हून त्याच्यावर उपचार सुरू केले.

Rajasthan : तरुणाला साप चावला, घरच्यांकडून आयसीयूमध्ये मंत्रतंत्र; डॉक्टरांनी काढली खरडपट्टी
तरुणाला साप चावला, घरच्यांकडून आयसीयूमध्ये मंत्रतंत्र; डॉक्टरांनी काढली खरडपट्टी Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:32 PM

राजस्थान – राजस्थानमधील (Rajasthan) करौली (Karouli) भागात एक अतिशय विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. सर्पदंश झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र तिथे तरुणाच्या घाबरलेल्या कुटुंबियांनी तिथं त्याच्या अंगावरती झाड फुंक मारायला सुरुवात केली. हा प्रकार डॉक्टरांच्या (Doctor) लक्षात येताचं, त्यांनी या कृत्याबद्दल खडसावलं. संपालेल्या डॉक्टरांनी तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांना आरडाओरड केली. त्याचबरोबर आम्हाला योग्य उपचार करु द्यावे अशी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे. देशात आजही अशा अनेक घटना घडत आहेत. अनेकदा अशा गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. राजस्थानमध्ये झालेली घटना अतिशय संतापजनक असल्याने त्याची अधिक चर्चा झाली आहे.

झोपेत असताना साप चावला

त्या तरुणाची गंभीर स्थिती पाहता त्या तरुणाचा इतरत्र हलवण्याची तात्काळ सांगण्यात आले. राजस्थानधील रिझोला बडापुरा येथील ही घटना आहे. तरुणाचं वय पंचवीस आहे. त्याचबरोबर रविवार सकाळी त्याला तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान साप चावला आहे. तो घरी झोपला होता. त्यावेळी त्याला साप चावला आहे. ज्यावेळी त्याला साप चावला त्यादरम्यान तो जोरात ओरडला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. ज्यावेळी त्यांच्या घरच्यांनी लाईट लावली त्यावेळी त्यांना त्यांच्या अंथरूनातून काळा साप दुसरीकडे जाताना दिसला. हे प्रकरण पाहिल्यानंतर घाबरलेल्या लोकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांनी काढली खरडपट्टी

तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलवावे लागले. उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून लपून तरुणाच्या कुटुंबीयांनी स्वत:हून त्याच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टर म्हणाले, “आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ अतिदक्षता विभागात पोहोचलो. झाड फुंक करण्याचं काम घरच्याकडून सुरु होतं. आम्ही तात्काळ त्याला थांबवले आणि या कृत्याबद्दल कुटुंबीयांना फटकारले असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.