मध्यम वर्गाला मोठा दिलासा, 4 दिवसात सोने 4,100 रुपयांनी स्वस्त झाले
देशात सोन्याच्या किंमतीत लागोपाट चौथ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. तर वायदा बाजारात लागोपाठ वाढ पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते वायदा बाजारातील दरवाढ सेफ हॅवन असेट्सच्या मागणीमुळे झाली आहे .

अमेरिका आणि चीनच्या टॅरिफ वॉरच्या दरम्यान भारताच्या मध्यम वर्गासाठी मोठी गुड न्यूज आहे. देशाची राजधानी दिल्लीसह देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या दरात लागोपाठ चौथ्या दिवशी घसरण झाली आहे.या चार दिवसात सोन्याच्या किंमतीत 4100 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. जाणकारांच्या मते येणाऱ्या दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशाच्या वायदा बजारामध्ये सोन्याच्या किंमतीत 2,600 रुपयांहून अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर आज किती होते आणि
सोन्याची लकाकी गेली
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी 88,550 रुपये होते. तर 22 कॅरेटचे 10 ग्रॅमचे दर 81,112 रुपये होते.तर दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 1,050 रुपयांच्या घसरणीसह 90,200 रुपये प्रति तोळा झाली आहे. बाजार बंद होताना 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 91,250 रु प्रति एक तोळ्यावर ( 1O ग्राम ) बंद झाला होता. 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 1,050 रुपये कोसळून 89,750 रुपये प्रति 10 ग्राम राहीले आहे. तर मंगळवारी हा भाव 90,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. परंतू चांदीची किंमत 500 रुपये वाढून 93,200 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.मंगळवारी चांदी 92,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. चांदीच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली आहे. दोन दिवसांत चांदी 700 रुपये महाग झाली आहे.
परदेशी बाजारात दरवाढ
जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कचाटीत सापडली आहे, ज्यामुळे सेफ हॅवन असेट्सची मागणी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 3,030 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त शुल्क लादले आहे, जे आता 104 टक्क्यांवर पोहोचले आहे.




चीनचे प्रत्युत्तर
चीनने या प्रकरणात प्रत्युत्तर देत अमेरिकेवरील शुल्क 34 टक्क्यांवरून 84 टक्के केले आहे. चीनचा हा निर्णय 10 एप्रिलपासून लागू होणार आहे. या ताज्या घडामोडीमुळे अमेरिकेसोबत पूर्ण विकसित व्यापार युद्ध सुरु झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. याशिवाय, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकन डॉलरवर दबाव वाढत राहिला, जो सलग दुसऱ्या दिवशी घसरला, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आणखी फायदा झाला आहे