होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या त्या सासूसोबत मोठं कांड? तरुणाच्या एका फोननं अख्ख कुटुंब सून्न
उत्तर प्रदेशमधील अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत तिची आईच पळून गेल्याची घटना घडली. या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत तिची आईच पळून गेल्याची घटना घडली. आता या प्रकरणात एक नवी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सासू आपल्या होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली, आणि त्यानंतर ते दोघे पळून गेले. मात्र एक दिवस आपल्या होणाऱ्या सासुला पळून घेऊन गेलेल्या तरुणचा फोन आला, यावेळी बोलताना त्यानं म्हटलं की, आता सासूच राहिली नाही तर मी घरी येऊन काय करू, त्याचा या फोनमुळे दोन्ही कुटुंबाचं टेन्शन वाढलं असून, सासुसोबत काही चुकीचं तर घडलं नाहीना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान अजूनही पोलिसांना त्या दोघांना शोधण्यात यश आलेलं नाहीये.
ही घटना अलीगढमधील एका गावात घडली आहे. या गावातील रहिवासी असलेले जितेंद्र कुमार यांची मुलगी शिवानीचा विवाह काही महिन्यापूर्वी राहुलसोबत ठरला होता. आपल्या मुलीच्या लग्नासाठी जितेंद्र कुमार यांनी पाच लाख रुपयांचे दागिने तयार केले होते. तसेच घरामध्ये 3 लाख 50 हजारांची रोकड देखील होती. मात्र होणारा जावई हा होणाऱ्या सासुलाच घेऊन फरार झाला. सोबत त्यांनी घरातील सर्व दागिने आणि पैसे देखील लपांस केले. ही घटना दोन्ही कुटुंबासाठी धक्कादायक होती, या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत.
दरम्यान आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. एका नातेवाईकानं या संदर्भात दावा केला आहे, की राहुलचं त्याच्या वडिलांशी बोलणं झालं होतं, तेव्हा तो म्हणाला होता की आता माझी सासूच राहिली नाही तर मी घरी येऊन काय करू? त्यानंतर राहुने फोन कट केल्याचा दावा या नातेवाईकाने केला. त्यामुळे आता आपल्या जावयासोबत पळून गेलेल्या सासुसोबत काही घडलं तर नसावं ना? अशा शंका कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे. या दाव्यामुळे कुटुंब सुन्न झालं आहे.