नितीश कुमारांच्या पापाचा घडा भरणार; त्यांचीही अवस्था लालू प्रसाद यांच्यासारखीच होणार; भाजपने दिला सबुरीचा सल्ला
नितीश कुमार यांच्यामुळे बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आल्यानंतर मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. एनडीए सरकारमधले प्रवक्ते असलेले विजय कुमार सिन्हा यांनी तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अवस्था त्यांचे राजकारणातील मोठे बंधू लाल प्रसाद यादव यांच्याप्रमाणेच भ्रष्टाचारामुळे तुरुंगात दिसून येतील
पाटणाः बिहार मंत्रिमंडळातील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा (Opposition Leader Vijay Kumar Sinha) यांच्याकडून मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करताना सांगितले की, बिहामध्ये भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर संयुक्त जनता दलाचे (JDU) नेते लवकरच तुरुंगात दिसून येतील. नितीश कुमारांमुळे राज्यातील भ्रष्टाचार (Fraud) वाढला असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यादिवसांपासून भाजपबरोबर नितीश कुमारांनी फारकत घेतली आहे, त्या दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात येत आहे. भाजपचे सरकार आल्यानंतरच महागठबंधन सरकारवर सातत्याने आरोप करत आहे. आमदार अनंत सिंह यांचे निकटवर्तीय कार्तिकेय कुमार यांना भाजपच्या हल्ल्यानंतर नितीश कुमार मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
नितीश कुमार तुरुंगात जाणार
नितीश कुमार यांच्यामुळे बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आल्यानंतर मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. एनडीए सरकारमधले प्रवक्ते असलेले विजय कुमार सिन्हा यांनी तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अवस्था त्यांचे राजकारणातील मोठे बंधू लाल प्रसाद यादव यांच्याप्रमाणेच भ्रष्टाचारामुळे तुरुंगात दिसून येतील, आणि त्याचवेळी त्यांना त्यांच्या पापाची आठवण होईल असंही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पापाचा घडा भरल्यानंतर ते नक्कीच तुरुंगात असतील असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे..
नितीशकुमारांचा पलटवार
नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना त्यांनी नितीश कुमारांच्या राजकीय आकडेवारीबद्दल बोलताना सांगितले की, 2014 मध्ये भाजपला 50 जागाही जिंकता येणार नसल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला होता. त्यानंतर पाटणा येथील संयुक्त जनता दलाच्या कार्यालयातही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 जागा कमी होणार आहेत. नितीश कुमारांकडून अशी वक्तव्य केली जात असली तरी त्यांचा हा दावा फारकाळ टिकून राहत नाही असंही सिन्हा यांनी बोलताना सांगितले.
नितीश यांचे वक्तव्य हास्यास्पद : भाजप
आगामी निवडणुकांविषयी नितीश कुमार यांच्या दाव्याविषयी बोलताना विजय कुमार सिन्हा यांनी हा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे तर त्याचवेळी सिन्हा यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दायवरुन नितीश कुमारांना घेरले.