वडील वारले, अभ्यास नाही झाला, उत्तर पत्रिकेत लिहील्या प्रेमाच्या गोष्टी

बारावीच्या परीक्षांचे पेपर संपून शिक्षकांना मुलांचे पेपर देखील तपासून पूर्ण केले आहेत. या परीक्षेची उत्तर पत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. एका विद्यार्थीनीने शिक्षकांनी आपल्याला मार्क्स देऊन पास करावे, यापुढे मी चांगला अभ्यास करु शूर मुलगी बनेल असे म्हटले आहे. भौतिक शास्राच्या उत्तर पत्रिकेत तिने प्रेमाचा सिद्धांत लिहीला आहे. आपल्याला हे लिहायची वेळ आल्याचे म्हटले आहे.

वडील वारले, अभ्यास नाही झाला, उत्तर पत्रिकेत लिहील्या प्रेमाच्या गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 7:01 PM

पाटणा | 5 मार्च 2024 : सध्या परीक्षांचे दिवस सुरु आहेत. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाची तयारी करीत असतात. त्या संपूर्ण वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ रिझल्ट लागल्यानंतर मिळते. विद्यार्थी कधीकधी उत्तर पत्रिकेत प्रश्नाची उत्तरे लिहीण्याच्या ऐवजी भलतेच काही बाही लिहीत असतात. ती उत्तरे वाचून शिक्षकांचे मनोरंजन होते. अशा एक प्रकार बिहारातील 12 वीच्या एका विद्यार्थीनीने केला आहे. तिने आपल्या पेपर तपासणाऱ्या शिक्षकांसाठी एक संदेश लिहीला आहे. तो वाचून शिक्षकांना देखील वाईट वाटले आहे. हा संदेश आता व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. यात या विद्यार्थीनीने आपल्या वडीलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे आपल्याला नीट अभ्यास करता आला नाही. त्यामुळे प्लीझ आपल्याला मार्क देऊन पास करा अशी विनवणी शिक्षकांना केली आहे.

बिहार बोर्ड परीक्षेचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. बिहारच्या जमुई येथील दोन केंद्रांवर 12 परीक्षेच्या गुणांचे वाटप सुरु असताना एका विद्यार्थीनीच्या उत्तर पत्रिकेतील उलटसुटल उत्तरे पाहून शिक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत. विद्यार्थीनीने लिहीले की आपल्याला हे सांगणे खूप गरजेचे आहे.मला माहीती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. सर माझे पप्पा यांची डेथ झाली आहे.दहा दिवस झाले आहेत. आणि माझा अभ्यासही झालेला नाही. तसेच माझी तब्येतही खराब झाली आहे. तरीही मी परीक्षा द्यायला आली आहे. त्यामुळे सर प्लिझ मला गुण द्या. प्लीझ माझी कंडीशन खूप खराब आहे.मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल.

bihar 12th exam –

उत्तर पत्रिकेत लिहील्या प्रेमाच्या गोष्टी

विद्यार्थीनीच्या उत्तर पत्रिकेला वाचून शिक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत. भौतिक शास्राच्या उत्तरपत्रिकेत या विद्यार्थीनीने प्रेमाच्या गोष्टी लिहील्या आहेत. ओमीय आणि अनओमीय तत्व काय आहे या प्रश्नाचे उत्तर लिहीताना तर या विद्यार्थीनीने अजब गोष्टी लिहील्या आहेत. याचे उत्तर लिहीताना जसे आपल्याला माहीतीच आहे की प्रेम लवकर होत नाही. परंतू जर प्रेम झाले तर जबरदस्त होते. यालाच अनमोमीय म्हणतात. यापुढे या विद्यार्थीनीने आपण यापुढे मन लावून अभ्यास करु अशी हमी देखील दिली आहे. जो कोणी माझा पेपर चेंकीग करेल त्यांनी प्लीझ मला चांगले मार्क्स द्यावेत. त्यामुळे मी एक साहसी मुलगी बनू शकेल.

डोक्याला जखम झाल्याची तक्रार

आपल्या डोक्याला जखम झाल्याचे या विद्यार्थीनीने उत्तर पत्रिकेत लिहीले आहे. तुम्हाला हे माहीती नसेल की माझ्या डोक्याला जखम झाल्याने मी अभ्यास करु शकलेले नाही.या विद्यार्थीनीची उत्तर पत्रिका व्हॉट्स अप वर व्हायरल होत आहेत.

bihar exam paper viral –

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.