अगोदर सत्तेत सोबत..आता म्हणतात..नावालाही उरणार नाहीत…बिहारमध्ये राजनीती कूस बदलणार?
नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या एकीमुळे बिहारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र देशात मोदी सरकार आहे.
पाटणाः बिहारच्या राजकारणाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) वेगवेगळे प्रयोग करत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) दोन दिवस बिहारच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी आज लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एक प्रकारचा इशाराही दिला आहे. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांनी वेगवेगळे प्रयोग करुन भाजपला आयत्या वेळी सत्तेत बाजूला केले. आरजेडी सोबत युती केली आणि पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्रीही बनले.
या सत्ता बदलानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमध्ये ते दोन दिवस थांबणार आहेत.
बिहार दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी अमित शाह यांनी पूर्णियामध्ये रॅलीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीवरुन या दोघांनाही इशारा देत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या दोघांचाही सुपडासाफ होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी केला आहे.
अमित शहा बिहार दौऱ्यावर आल्यावर पहिल्या प्रथम त्यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या स्वार्थासाठी लालू प्रसाद यादवांना जवळ केल्याचे सांगत पदासाठीचे लालू प्रसाद यादवांच्या ते मांडीवर बसले असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीश कुमारांनी हे असले राजकारण केले असले तरी देशात मोदी सरकार आहे, त्यामुळे घाबरण्याचे कोणालाही कारण नाही असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला.
अमित शहा यांनी नितशी कुमारांवर टीका करताना त्यांनी लालू प्रसाद यादवांवरही टीका केली. यावेळी ते म्हणाले की, नितीश आणि लालू माझ्यावर टीका करताना मी भांडण, वाद घालायला आलो असल्याचे लोकांना सांगत आहेत.
मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे की भांडण सुरु करण्यासाठी माझी नाही तर फक्त लालू प्रसाद यादवांची गरज आहे. भांडण लावण्याचेच काम त्यांनी आयुष्यभर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या एकीमुळे बिहारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र देशात मोदी सरकार आहे.
त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. सीमांचलमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपने जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठीच आणि तोच हिशेब देण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमित शहा दौऱ्यावर असतानाच त्यांनी बिहारमध्ये भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. नितीश कुमारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले की, बिहारच्या जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री करुन तुम्हाला फायदा मिळवून दिला आहे.
मात्र आगामी निवडणुकीत आता तसं होणार नाही. 2024 मध्ये लालूंचाही आणि तुमचाही पक्ष येणार नाही तर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच कमळ फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शहा यांनी 2014 च्या निवडणुकीविषयी बोलताना म्हणाले की, त्यावेळी लोकसभेच्या त्यावेळी फक्त 2 जागा होत्या. तर आता तुम्ही बिहारमध्ये ‘ना घर के रहे नही घाट के अशीच अवस्था तुमची होणार आहे.
त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुका फक्त होऊ द्या मग बिहारची जनता राजकारणातूनच तुमचा सूफडासाफ करेल असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे.