‘बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु’

बिहारमध्ये NDA सत्तेत आल्यानंतर आणखी कुठल्या तपासाची आवश्यकता असेल तर तेही केलं जाईल. | Sushant singh Rajput

'बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु'
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 4:04 PM

पाटणा: बिहारमध्ये पुन्हा एकदा NDAची सत्ता आल्यास आम्ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणामागील खऱ्या कारस्थानाचा पर्दाफाश करु, असा दावा भाजप आमदार नीरजकुमार उर्फ बबलु सिंह यांनी केला आहे. नीरजकुमार हे सुशांत सिंह याचे चुलतभाऊ आहेत. बिहारमध्ये सध्या चांगले वातावरण आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA)सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. याठिकाणी डबल इंजिनचे सरकार चालते. लोक खुष आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत NDAचा पराभव होणार नाही, असा दावा यावेळी नीरजकुमार यांनी केला. (If NDA come into power again we will solve Sushant singh Rajput case)

नितीशजी 15 वर्षे मुख्यमंत्री आहेत. आणखी पाच वर्षे राहतील. त्यानंतर त्याचे वय 75 वर्षे होईल. मग कुणाला राजकारणात रस असतो. त्यानंतर ते शांतपणे देशसेवा-समाजसेवा करतील. त्यामुळे नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. या निवडणुकीत NDA पूर्ण बहुमताने सत्तेत येईल. आम्हाला जवळपास 70 टक्के मते मिळतील, असे नीरजकुमार यांनी सांगितले.

याठिकाणी परिवर्तन करण्याची गरज नाही. लोकांना पुन्हा जंगलराज नको आहे. त्या राजवटीला लोक वैतागले होते. मतदार सतर्क आहेत. जी गर्दी त्यांच्याकडे जमा झाली ती आणली गेली होती, ती केवळ हेलिकॉप्टर बघण्यासाठी व्हायची, अशा शब्दांत नीरजकुमार यांनी तेजस्वी यादव यांची खिल्ली उडविली.

सुशांत बिहारचा मुलगा होता. आमचा कुटुंब सदस्य होता. तो बिहारचा नावारुपाला येणारा कलाकार होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे बिहारच्या लोकांमध्ये आक्रोश होता. पण आम्ही हा राजकीय मुद्दा बनवला नाही. आम्ही NDA सोबत आहोत. आणि सुशांतच्या मृत्यू नंतर NDA ला जे करायचे होते ते आम्ही केलं आहे. पुढे जे सरकार अस्तित्वात येईल तेही सुशांतच्या नावावर इथे काही ना काही करेल. सध्या CBI प्रकरणाचा तपास करीत आहे. शेवटी सत्य समोर येईलच, हा विश्वास आम्हाला आहे.

सध्या CBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आता ED सुद्धा या तपासात सहभागी झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या पैलुंनी या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काही संपलेलं नाही. योग्यवेळी सत्य परिस्थिती लोकांसमोर येईल. बिहारमध्ये NDA सत्तेत आल्यानंतर आणखी कुठल्या तपासाची आवश्यकता असेल तर तेही केलं जाईल. या मागे कोणते कारस्थान आहे त्याचा पर्दाफाश होईलच, असा दावा नीरजकुमार यांनी केला.

संबंधित बातम्या:

Bihar Assembly Election 2020 Live : तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर दुपारी दोन वाजेपर्यंत 39.31 टक्के मतदान

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस

(If NDA come into power again we will solve Sushant singh Rajput case)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.