बिहार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत जोरदार राडा, नितीश कुमारांना विधानसभेतून बाहेर काढण्यावर तेजस्वी अडले!
बिहार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यावेळी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार आणि अन्य विधान परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीवरुन जोरदार राडा घातला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नितीश कुमार यांनी बाहेर जावं यावर तेजस्वी यादव अडून राहिले.
पाटणा: बिहार विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन RJDचे नेते तेजस्वी यादव आणि अन्य सदस्यांनी जोरदार राडा घातला. विधान परिषदेचे सदस्य नितीश कुमार आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीवर तेजश्वी यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुख्यमंत्री नितीश कुमार, मंत्री अशोक चौधरी, मंत्री मुकेश सहनी हे विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. त्यावरुन RJDच्या नेत्यांनी मोठा गोंधळ घातला.(Tejaswi Yadav aggressive in Bihar Assembly speaker election)
बिहार विधानसभा अध्यक्ष पदासाठी सत्ताधाऱ्यांकडून भाजपचे आमदार विजय सिन्हा तर विरोधकांकडून RJDचे आमदार अवध बिहारी चौधरी हे मैदानात आहेत. प्रोटेम स्पीकर जीतनराम मांझी यांनी सर्वसंमतीनं अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वीही सर्वसंमतीनं विधानसभा अध्यक्ष निवडण्याची परंपरा कायम होती. मात्र यावर्षी भाजपनं विजय सिन्हा यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे RJDनेही अवध बिहारी चौधरी यांची उमेदवारी दाखल केली आहे.
सत्ताधारी भाजप, JDU आणि अन्य मित्रपक्ष मिळून 126 आमदार आहेत. तर विरोधकांकडे 110 आमदार आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाच्या 5 आमदारांनीही सर्वसंमतीनं अध्यक्ष निवडीला पाठींबा दिल्यानं महाआघाडीला झटका बसला आहे. दर LJP चा एका आणि एका अपक्षाने NDAला पाठींबा दिला आहे. तर महाआघाडीचे दोन आमदार तुरुंगात असल्यानं ते विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ शकले नाहीत. NDAचे दोन आमदारही शपथ घेऊ शकलेले नाहीत.
लालू यादवांकडून NDAचे आमदार फोडण्याचा प्रयत्न?
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीदरम्यान लालू प्रसाद यादव यांच्याकडून NDAचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे. सुशील मोदी यांनी एक ऑडिओही जारी केला आहे. ज्यात लालू प्रसाद यादव NDAच्या आमदाराला कोरोनाचं कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी आणि त्याबदलात महाआघाडी सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचं प्रलोभन देताना ऐकायला मिळत आहे.
लालू यादव ने दिखाई अपनी असलियत
लालू प्रसाद यादव द्वारा NDA के विधायक को बिहार विधान सभा अध्यक्ष के लिए होने वाले चुनाव में महागठबंधन के पक्ष में मतदान करने हेतु प्रलोभन देते हुए। pic.twitter.com/LS9968q7pl
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 25, 2020
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्वीटमुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “लालू प्रसाद यादव रांचीतील तुरुंगात बसून NDAच्या आमदारांना फोन करुन मंत्रिपदाचं आश्वासन देत आहेत. जेव्हा मी फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनीच उचलला. तुरुंगात बसून अशा घाणेरड्या चाली खेळू नका. तुम्हाला यात यश मिळणार नाही, असं मी त्यांना सांगितल्याचा” दावा सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
Lalu Yadav making telephone call (8051216302) from Ranchi to NDA MLAs & promising ministerial berths. When I telephoned, Lalu directly picked up.I said don’t do these dirty tricks from jail, you will not succeed. @News18Bihar @ABPNews @ANI @ZeeBiharNews
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 24, 2020
संबंधित बातम्या:
तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी ‘धन्यवाद यात्रा’ काढणार
Tejaswi Yadav aggressive in Bihar Assembly speaker election