बिहारमध्ये पुन्हा नितीश-लालूंच्या कचाट्यात भाजप? भाजपचे ‘सुमो’ सक्रिय
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील RJDच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत नितीश कुमार यांना महाआघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत वक्तव्य केली आहेत. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील व्यक्तीनं हे वक्तव्य पहिल्यांदाच केलं आहे.
पाटना: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या एका वक्तव्यानं बिहारचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महाआघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत विचार सुरु असल्याचं वक्तव्य राबडी देवी यांनी केलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राबडी देवी यांनी हे वक्तव्य केल्यानं पुन्हा एकदा बिहारमधील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rabadi devi on Nitish Kumar and Maha aghadi)
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील RJDच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत नितीश कुमार यांना महाआघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत वक्तव्य केली आहेत. मात्र, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील व्यक्तीनं हे वक्तव्य पहिल्यांदाच केलं आहे. त्यामुळे या वक्तव्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
राबडी देवी काय म्हणाल्या?
राबडी देवी यांनी बिहारच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नितीश कुमार यांना महाघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत आपत्ती नसल्याचं वक्तव्य केलं. याबाबत पक्षाचे नेते विचार करत आहेत. सर्वसहमतीनं यावर निर्णय घेतला जाईल. त्यासाठी आफण RJDचे अध्यक्ष जगदानंद सिंह आणि अन्य नेत्यांशी चर्चा करु, असंही राबडी देवी म्हणाल्या. दरम्यान, RJD नेत्यांची या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता खुद्द राबडी देवी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सुशीलकुमार मोदींचं प्रत्युत्तर
राबडी देवी यांच्या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज्यातील गरीब-कामगार, युवक- महिलांनी ज्या पक्षाच्या अनुभवशून्य वंशवादी नेतृत्वाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. त्या पक्षाचा एखादा नेता NDAचे आमदार फोडण्याचे नवनवे दावे करुन आपली लॉयल्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे’, असं ट्वीट सुशील मोदी यांनी केलं आहे.
बिहार विधानसभा चुनाव से पहले लालू प्रसाद की पार्टी अपने दर्जन भर एमएलए- एमएलसी को जदयू में जाने से नहीं रोक पायी। जिसका 10 लाख लोगों को एक झटके में सरकारी नौकरी देने का अव्यावहारिक वादा नकार दिया गया।
— Sushil Kumar Modi (@SushilModi) January 1, 2021
लालू यादवांविरुद्ध गुन्हा
लालू यांच्याविरोधात तरुंगातून भाजप आमदार ललन पासवान यांना फोन केल्याप्रकरणी पाटण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार ललन पासवान यांनीच लालूंविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
लालू चारा घोटाळ्या प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच तब्येतीच्या कारणामुळे त्यांना रांची येथील एका बंगल्यात ठेवण्यात आले होते. मात्र, फोन प्रकरणानंतर त्यांना लगेचच रिम्समधील खासगी वार्डात शिफ्ट करण्यात आलं. भाजपने लालू प्रसाद यादव यांच्यावर तुरुंगात शिक्षा भोगत नसून बंगल्यात आराम करत असल्याचाही आरोप केला होता.
संबंधित बातम्या:
तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ : संजय राऊत
Rabadi devi on Nitish Kumar and Maha aghadi