Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar election result 2020: बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा भाजपला मोठा फायदा, प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले योगी आदित्यनाथ यांनी ज्या-ज्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या त्या जागांवर भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर मोठा फटका बसला होता. अशा जागांवर योगी आदित्यनाथ यांनी NDAचा प्रचार केला.

Bihar election result 2020: बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा भाजपला मोठा फायदा, प्रचार केलेल्या सर्व जागांवर भाजप आघाडीवर
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:20 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक निकालाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार NDAला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो, असा कल सध्या पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजपला मिळत असलेल्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा वाटा म्हणावा लागेल. (BJP benefits from Uttar Pradesh CM Yogi Adityanath’s campaign in Bihar)

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले योगी आदित्यनाथ यांनी ज्या-ज्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या त्या जागांवर भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये आठवड्याभरात एकूण 18 रॅली काढल्या. म्हणजे योगी यांनी दिवसाला 3 प्रचार रॅली केल्या. महत्वाची बाब म्हणजे 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला ज्या जागांवर मोठा फटका बसला होता. अशा जागांवर योगी आदित्यनाथ यांनी NDAचा प्रचार केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांनी 6 जागांवर प्रचार केला. त्यात जमुई, काराकाट, पालीजंग, तरारी, अरवल या जागांचा समावेश होता. या सर्व जागांवर 2015मध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. यासह पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरेयाकोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर आणि दरभंगा या जागांवरही योगींनी प्रचार केला. या ठिकाणी योगींचा प्रचार कामी येताना दिसत आहे.

‘मोदी है तो मुमकीन है’- योगी आदित्यनाथ

बिहार विधानसभा निवडणुकीत NDAला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्या पार्श्वभूमीवर मोदी है तो मुमकीन है, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. बिहारमध्ये भाजपच्या वाढलेल्या जागा हे भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं यश असल्याचं योगीं म्हणाले. कोरोना संकटातही ‘संघटन ही सेवा है’ अशा भावनेतून कार्यकर्त्यांनी काम केलं. त्याचाच परिणाम म्हणून बिहारमध्ये जागा वाढल्याचं योगी आदित्यनाथ पत्रकार परिषदेत म्हणाले.

“फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला यश”

“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे”, असा दावा भाजपचे विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Bihar Election Result : ज्ञानू, टीव्ही बंद कर, कोणाला सांगू नकोस, आम्ही इथे आहोत; नितीशकुमारांचा ‘तो’ किस्सा पुन्हा एकदा चर्चेत

BJP benefits from Uttar Pradesh CM Yogi Adityanath’s campaign in Bihar

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.