“देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”, बिहारमध्ये अनेक जागी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला निलेश राणेंचा टोला
भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजपच्या राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी सुरु केली आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. (Rane brothers criticize Shiv Sena’s performance in Bihar assembly elections)
निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी असं लिहीत, ‘वारंवार देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’ अशी उपरोधिक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी.
बेनीपूर: शिवसेना 469 मते, नोटाला 2145
राघोपुर: शिवसेना-30, नोटा-310
गया: शिवसेना-21 मते, नोटा-79.
मधुबनी: शिवसेना-63, नोटा-222
नरपतगंज: शिवसेना-२, नोटा-50
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2020
भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर चांगलाच हल्ला चढवला. “बिहारमधील मुस्लिमबहुल भागात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतं तर त्या ठिकाणी भाजप उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. हा महाराष्ट्र इफेक्ट आहे का? महाराष्ट्रात शिवसेनेसोबत गेल्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आपली व्होट बँक गमवावी लागत आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
After the Bihar results.. it’s Interesting 2 see how Congress has failed in the muslim dominated areas while the BJP has gained.. Maharashtra effect? Goin with the confused Shiv Sena has damaged The traditional vote bank of the Congress at the national level.. time 2 Intorspect?
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2020
नितेश राणे यांनी एक चार्ट ट्वीट करत काँग्रेसला पारंपरिक मतांमध्ये बसलेला फटका दाखवला आहे. तो दाखवताना राणे यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
This is what has happened to the traditional vote bank of the Congress..Thanks to the Shiv Sena! pic.twitter.com/ih6TX2fcHa
— nitesh rane (@NiteshNRane) November 11, 2020
कोणत्या मतदारसंघात शिवसेनेला मोठा दणका?
पालिगंज गया शहर वझीरगंज चिरैया मानेर फुलपरेश राघोपूर बेनिपूर मधुबनी तरैया अस्तवा औरिया कल्याणपूर बानमंखी ठाकूरगंज समस्तीपूर सराई मोरवा किशनगंज बहादूरगंज नरपतगंज मनिहारी
2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी
- शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
- एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
- तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
- चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
- पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
- एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
- शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)
संबंधित बातम्या:
Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!
बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या
Rane brothers criticize Shiv Sena’s performance in Bihar assembly elections