Bihar Election: बिहारमध्ये ‘हे’ नेते ठरले औटघटकेचे मुख्यमंत्री; पाच दिवसांत पडले सरकार

आतापर्यंत बिहारमध्ये एकूण 23 नेते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यापैकी केवळ 13 जणांनाच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहता आले. | Bihar CM

Bihar Election: बिहारमध्ये 'हे' नेते ठरले औटघटकेचे मुख्यमंत्री; पाच दिवसांत पडले सरकार
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 9:50 AM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्यावेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरून बिहारमध्ये त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय होणार, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय नाट्य रंगणार का? विरोधी पक्षातील नेते फोडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न होणार का, याचे उत्तर आगामी काळच देईल. (shortest term chief ministers in Bihar)

बिहारच्या जनतेने आतापर्यंत जवळपास 12 मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ अनुभवला आहे. यापैकी काहीजणांनी आपली टर्म पूर्ण केली तर काहीजण औटघटकेचे मुख्यमंत्री ठरले. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे पहिल्या टर्ममध्ये केवळ सात दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. मात्र, अशी दुर्दैवी वेळ आलेले नितीश कुमार हे बिहारमधील एकमेव नेते नाहीत.

आतापर्यंत बिहारमध्ये एकूण 23 नेते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यापैकी केवळ 13 जणांनाच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहता आले. उर्वरित 10 नेत्यांना फार थोडा काळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसता आले.

यामध्ये संयुक्त सोशालिस्ट पक्षाचे नेते सतीश प्रसाद सिंह यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 1967 साली सतीश प्रसाद मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, त्यांचे सरकार केवळ पाच दिवस टिकले. त्याकाळी प्रचंड ताकदवान असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे बिहारमध्ये पहिल्यांदाच महामाया प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली बिगरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले.

मात्र, हे सरकार एक वर्षही टिकले नाही. यानंतर सतीश प्रसाद सिंह हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, पाच दिवसांतच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. त्याऐवजी सतीश प्रसाद सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

नितीश कुमार यांनादेखील पहिल्यावेळी सात दिवसच मुख्यमंत्री राहता आले. मात्र, नंतरच्या काळात नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, सतीश प्रसाद यांना पुन्हा मुख्यमंत्री होताच आले नाही. त्यामुळे सतीश प्रसाद यादव यांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. याशिवाय, काँग्रेस नेते दीप नारायण सिंह यांच्या नावावरही अशाच विक्रमाची नोंद आहे. ते केवळ 18 दिवस बिहारचे मुख्यमंत्री होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | महागठबंधनने बहुमताचा आकडा गाठला, भाजप दुसरा मोठा पक्ष

Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादवांसाठी शुभशकुन? समर्थक मासे घेऊन घराबाहेर

Nitish Kumar LIVE News and Updates: बिहारमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार NDA ची अखेर शंभरी पार, नितीश कुमार यांचा JDU तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता

(shortest term chief ministers in Bihar)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.