भाजपच नव्हे बिहारमध्ये डाव्यांचीही हवा; 18 जागांवर घेतली आघाडी

एकेकाळी बिहारमध्ये डाव्या पक्षांचे प्रचंड प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या लक्षणीयरित्या घटली होती. | Bihar election results 2020

भाजपच नव्हे बिहारमध्ये डाव्यांचीही हवा; 18 जागांवर घेतली आघाडी
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:01 PM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या संथ मतमोजणीमुळे सध्या राज्यातील चित्र दोलायमान आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर महागठबंधन 102 जागांवर आघाडीवर आहे. भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर असली तरी ही परिस्थिती किती काळ टिकेल, हे कोणत्याच राजकीय तज्ज्ञाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सध्या वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. (Left parties stunning performance in Bihar election results 2020)

मात्र, या सगळ्यात डावे पक्ष मात्र चांगलेच खुशीत आहेत. कारण, डाव्या पक्ष लढवत असलेल्या 29 जागांपैकी 20 जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. राजद आणि काँग्रेसच्या यांच्या महागठबंधनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी डावे) सहभागी झाले होते. या पक्षांकडून अगिआव, अराह, अरवाल, बलरामपूर, बिभुतीपूर, दाराउली, दराऊंधा, दुमराव, घोसी, करकट, मांझी, मथिहानी, पालीगंज, तरारी,वारिसनगर, झिरादेई, बचवारा आण बखरी या जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.

एकेकाळी बिहारमध्ये डाव्या पक्षांचे प्रचंड प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या लक्षणीयरित्या घटली होती. 2010 मध्ये माक्सर्वादी पार्टी ऑफ इंडियाला बिहारमध्ये केवळ एकच जागा जिंकता आली. तर 2015 मध्ये CPI(ML) पक्षाने एक जागा जिंकली होती. तेव्हा इतर दोन्ही डाव्या पक्षांच्या पाट्या कोऱ्या राहिल्या होत्या.

मात्र, यंदाची निवडणूक डाव्या पक्षांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. याचा फायदा महागठबंधनलाही मिळणार आहे. प्रचाराच्या काळात महागठबंधनचा आर्थिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पसरवण्यात डाव्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत डाव्या पक्षांना 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता 19 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याने हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा, बिहार भाजपची कृतज्ञता

Bihar election results 2020: ‘अनेक जागांवर 500 -1000 मतांचाच फरक, निवडणुकीचे चित्र पुन्हा पालटू शकते’

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

(Left parties stunning performance in Bihar election results 2020)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.