सरकार कुणाचंही असो, मुख्यमंत्रिपद नीतीश कुमार यांच्याचकडे का?; बिहारच्या राजकारणातला ‘नीतीश फॅक्टर’ काय?

JDU Leader Nitish Kumar Career and Bihar Political Crisis : बिहारचे 'इंजिनिअर बाबू' ते नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री; 17 वर्षं बिहारच्या राजकारणावर पकड ठेवण्यात नीतीश कुमार यशस्वी कसे झाले? सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील 'नीतीश कुमार पॅटर्न' जाणून घेऊयात. वाचा सविस्तर...

सरकार कुणाचंही असो, मुख्यमंत्रिपद नीतीश कुमार यांच्याचकडे का?; बिहारच्या राजकारणातला 'नीतीश फॅक्टर' काय?
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 2:58 PM

पटना, बिहार | 28 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज नितीश कुमार हे नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले ‘इंजिनिअर बाबू’ बिहारच्या राजकारणात इतके महत्वाचे का ठरतात? मागची 17 वर्षे नीतीश कुमार यांची बिहारच्या राजकारणावर घट्ट पकड असण्याची कारणं काय आहेत? पाहुयात…

17 वर्षांपासून वर्चस्व कायम

बिहारच्या राजकारणात सतत बदल होत असतात. सातत्याने राजकीय युत्या आघाड्या होतात आणि त्या मोडतानाही दिसतात. अशात या राजकीय डावपेचात टिकून राहणं महत्वाचं ठरतं. यात नीतीश कुमार वरचढ ठरतात. कारण मागच्या 17 वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सक्रीय आणि आपली स्पेशल स्पेस टिकवून आहेत. जरी आघाडी किंवा युती तोडली तरी बिहारमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना नीतीश कुमार यांनी आपल्या बाजूने असणं फायदेशीर ठरतं.

युतीचं टायमिंग

सत्तेत एनडीए असो की युपीए… पण बिहारच्या मुख्यमंत्रिपदी मागच्या कित्येक वर्षांपासून एकच चेहरा दिसतो आहे. नीतीश कुमार कधी राजदसोबत जात सरकार स्थापन करतात. तर कधी भाजपशी हात मिळवणी करतात. नीतीश कुमार यांची पुढची चाल काय असेल आणि ते कुणासोबत युती करतील याचा अंदाज बांधता येत नाही. मागच्या कित्येक दिवसांपासून नीतीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. अचानकपणे त्यांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. थोडक्यात काय… तर जिथे स्पेस मिळेल त्यांच्याशी नीतीश कुमार हात मिळवणी करतात. तसे निर्णय घेतात.

 मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार नवव्यांदा शपथ घेणार

नीतीश कुमार उच्च शिक्षित आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. जेव्हा नीतीश कुमार शिक्षण घेत होते. तेव्हा त्यांना ‘इंजिनिअर बाबू’ या नावाने ओळखलं जायचं पुढे हेच इंजिनिअर बाबूंनी बिहारच्या राजकारणात आपला जम बसवला. तसंच आजही त्यांची जादू कायम आहे. थोड्याच वेळात ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.