नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्रालयच अडचणीत; अपहरण प्रकरणी मंत्रीपद गेलं; भाजपकडून बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेतले आहे. कार्तिकेय सिंह हे अनंत सिंह यांच्या जवळचे मानले जातात. एका जुन्या अपहरण प्रकरणी न्यायालयाकडून आरजेडी आमदार कार्तिकेय सिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ते वादात सापडले होते. त्यामुळे याबाबत भाजपकडून सातत्याने नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला जात होता.

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळातील कायदा मंत्रालयच अडचणीत; अपहरण प्रकरणी मंत्रीपद गेलं; भाजपकडून बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 8:52 AM

नवी दिल्लीः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish kumar) यांनी कार्तिकेय सिंह (kartikey singh) यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेण्यात आले आहे. कार्तिकेय सिंह हे अनंत सिंह यांचे निकटवर्तीय समजले जातात. एका जुन्या अपहरण प्रकरणी न्यायालयाकडून आरजेडी आमदार कार्तिकेय सिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ते वादात सापडले होता. याबाबत भाजपकडून सातत्याने नितीश सरकारवर निशाणा साधला जात होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेण्यात आल्यानंतर बिहारमध्ये चर्चेला उधाण आले कार्तिकेय सिंह हे अनंत सिंह यांच्या जवळचे मानले जातात. एका जुन्या अपहरण प्रकरणी न्यायालयाकडून आरजेडी आमदार कार्तिकेय सिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ते वादात सापडले होते. त्यामुळे याबाबत भाजपकडून (BJP) सातत्याने नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला जात होता. लोकशाहीची नितीश कुमारांनी थट्टा चालू केले अशी जोरदार टीकाही नितीश कुमार सरकारवर करण्यात आली आहे.

शमीम अहमद कायदा मंत्री झाले

बिहारच्या मंत्रिमंडळाती वाद वाढल्यानंतर नितीशकुमार यांनी कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेण्यात आले आहे. मात्र, कार्तिकेय सिंह यापुढेही मंत्री राहणार असल्याचे सांगितले जात असून त्यांच्याकडे आता ऊस उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. तर शमीम अहमद यांच्याकडे आता ऊस उद्योगाऐवजी कायदा मंत्रालय देण्यात आले आहे.

16 ऑगस्ट रोजी शपथ घेतली

नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडून महाआघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कार्तिकेय सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. राजदकडून त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, यानंतर कार्तिकेय सिंह यांना कायदा मंत्रालय देण्यात आले होते मात्र तेव्हापासून मोठे वाद सुरू झाले होते.

न्यायालयाकडून वॉरंट जारी

आरजेडी आमदार कार्तिकेय सिंह यांच्याविरोधात 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे वॉरंट काढण्यात आले होते. कार्तिकेय सिंह यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यासाठी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते, परंतु त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले नव्हेत मात्र त्यांनी 16 ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

भाजपने नितीश यांच्यावर साधला निशाणा

दुसरीकडे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी कार्तिकेय सिंह यांच्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती.न्यायालयात शरण जावे लागलेल्या कायदामंत्र्यांना राजभवनात कसे घेतला असा सवाल थेट सुशील कुमार मोदींनीच केला होता. कार्तिकेय सिंग हा बाहुबली अनंत सिंगचा उजवा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीश कुमार यांनी हे सर्व थांबवावे, असे सुशील मोदी म्हणाले होते. कार्तिकेयविरुद्धचे वॉरंट हे बनावट कागदपत्र नाही. लालू यादवांच्या दयेवर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आहेत. जे नवे मंत्री बनले आहेत, त्यात अनेक बाहुबली असल्याची टीकाही करण्यात आली होती. काही दिवसांत हे लोक बाहुबली मंत्री आणि नेत्यांना क्लीन चिट देतील, असा आरोपही नितीश कुमार सरकारवर करण्यात आला त्यामुळे नितीशकुमार यांनी या मंत्र्यांना बडतर्फ करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.