हे भगवान ! बायकोने पोलिसांसमोरच चपलेने हाणलं ; त्याने असं नेमकं काय केलं ?

पत्नीने भररस्त्यात सर्वांसमोर, पोलिसांसमोरही नवऱ्याला मारायला सुरूवात केली. तिने पायातली चप्पल काढूनच त्याला बेदम चोप दिला. हा सगळा प्रकार बाकी लोक शांतपणे उभ राहून बघत होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली.

हे भगवान ! बायकोने पोलिसांसमोरच चपलेने हाणलं ; त्याने असं नेमकं काय केलं ?
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 11:32 AM

पाटणा | 2 ऑक्टोबर 2023 : शादी का लड्डू जो खाए पछताए जो ना खाए वो ललचाए… अशी एक म्हण बहुतांश लोकांना माहीत असेलच. लग्नाच्या बाबतीतील हे वाक्य काही अंशी खरं आहे पण.. हेच लग्न एका इसमाला खूप भारी पडल. त्याच्या लग्नाच्या बायकोने त्याची सर्वांसमोरच चपलेने जोरदार पिटाई केल्याची धक्कादायक घटना घडली. ऐकून हबकलात ना, पण हे खरं आहे. त्या इसमाने नेमकं असं केलं तरी काय, की त्याला चपलांचा मार खावा लागला ?

मिळालेल्या माहितीनुसार,नालंदा जवळील एका गावात हा प्रकार घडला. एक महिला तिच्या पतीला सर्वांसमोर चपलेने हाणत होती आणि लोकंही मजेत हे सगळं बघत होती. आपल्या पतीन १० दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं असा आरोप महिलेने लावला. एवढंच नव्हे तर तो रोजच्या खर्चासाठी, काहीही पैसे देत नसल्याचेही तिचे म्हणणे आहे. या इसमाला तीन मुलंही आहेत. मात्र तरीही त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. आपलं आणि मुलांचं पालनपोषण करण्यासाठीही पैसे नाहीत, पतीही खर्चासाठी थोडेही पैसे देत नाही, असा आरोप महिलेने केला. ती अतिशय संतापली होती.

पत्नीचेच प्रेमप्रकरण सुरू आहे

मात्र पत्नीचे हे आरोप तिच्या पतीने सरळ धुडकावून लावले आहेत. ही माझ्यावर आरोप करते आहे पण उलट तिचंच दुसऱ्या व्यक्तीशी गेल्या 6 महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे, असा आरोपही तिच्या पतीने केला आहे. त्याच प्रियकरासोबत ती सहा महिन्यांपूर्वी पळून गेली. मी तिला परत आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही परत आलीच नाही, असं त्याने सांगितलं.

पब्लिक मजा बघत होती

यानंतर त्याने दोन महिन्यांपूर्वी कोर्टात दुसरे लग्न केले. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. बघता बघता हे भांडण चांगलचं पेटलं आणि रस्त्यावरही आलं. आजूबाजूला काहीही न पाहात, पुढचा मागचा विचार न करता पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत रस्त्यावरच भांडू लागले. त्यानंतर झालेला हायव्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी जमली होती.

पोलिस स्टेशनसमोरच चपलेने केली मारहाण

बघता बघता त्यांचा वाद चांगलाच पेटला आणि या भांडणात महिलेने पतीला रस्त्याच्या मधोमध, पोलिस ठाण्यासमोरच चपलेने बेदम चोप देण्यास सुरू केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बोलावून घेतले आणि त्यांची समज दिली.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.