Bihar Political Crisis : लालू बिन बिहार नाही चालणार..! भाजपचं सरकार पडल्यानंतर लालुंच्या मुलीने शेअर केलं गाणं
श्रावण महिन्यात माफिवीरांच्या गटाचा नाश होईल म्हणत त्यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे. दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लालूंना किंगमेकर संबोधले आहे.
पाटणा : बिहारमध्ये सध्या मोठं सत्तांतर होतंय. जेडीयू (JDU) आणि भाजपची (BJP) युती तुटली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नवी आघाडी तयार झाली आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी एक भोजपुरी गाणं शेअर करताना लिहिले आहे की, “राजतिलक की करो तैयार आर रहे हैं लालटेन धारी”. या गाण्यात लालू यादव यांच्यासोबत तेजस्वी यादवही दिसत आहेत. लालू बिना चलू बिहार ना होई, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे खेसारी लाल यादव यांनी गायले असून कृष्णा बेदर्दी यांनी लिहिले आहे. सध्या रोहिणी एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत. भोले बाबांच्या कृपेने चमत्कार घडतील, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. श्रावण महिन्यात माफिवीरांच्या गटाचा नाश होईल म्हणत त्यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे. दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लालूंना किंगमेकर संबोधले आणि लिहिले की त्यांचा आकाशाच्या उंचीपेक्षा जास्त विश्वास आहे, लोकांचा अभिमान आहे.
रोहिणी यांचं पहिलं ट्विट
“राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं , लालटेन धारी “✌️ pic.twitter.com/R0pYeaU2mN
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) August 9, 2022
रोहिणी यांचं दुसरं ट्विट
आसमान की बुलंदी से भी ऊंचा उनका ईमान है जनता-जनार्दन का जो अभिमान हैं? pic.twitter.com/STxIHZ2GWI
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) August 9, 2022
तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया
नव्या सरकारबाबत बोलताना तजस्वी यादव म्हणाले, बिहारच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मतभेद होणार नाहीत. आमचं संख्याबळ 160 आहे. भाजपने अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. आमचे सरकार बेरोजगार तरुणांना प्रथम प्राधान्य देणार आहे. दुसरीकडे, जेडीयूच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी ट्विट करून नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नव्या रूपात नव्या युतीचे नेतृत्व केल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन.
भाजपला मोठा झटका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूच्या अनेक आमदारांनी एमएलसीच्या बैठकीत नितीश कुमार यांना सांगितले की भाजप 2020 पासून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. चिराग पासवान यांचे नाव न घेता ते असेच एक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. आताच सावध झाले नाही तर पक्षाचं वाटोळं होईल, अशी भितीही त्यांना होती.