Nitish Kumar : बिहारमध्ये महाभूकंप! नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा सरकार स्थापनेचा दावा, आता भाजपची भूमिका काय राहणार?

नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार कोसळलं. त्यानंतर लगेच नितीश कुमार आणि तेजस्वी याजव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केलाय. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आपल्याला समर्थन दिलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे.

Nitish Kumar : बिहारमध्ये महाभूकंप! नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा सरकार स्थापनेचा दावा, आता भाजपची भूमिका काय राहणार?
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 7:03 PM

पाटना : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय महाभूकंप पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा एकदा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केलाय. नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार कोसळलं. त्यानंतर लगेच नितीश कुमार आणि तेजस्वी याजव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा (claim to form a Government) केलाय. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आपल्याला समर्थन दिलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे. इतकंच नाही तर 2017 मध्ये चूक झाली होती असंही नितीश कुमार यावेळी राज्यपालांना म्हणाल्याचं कळतंय.

नितीश कुमारांनी राज्यपालांकडे 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं

मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं आहे. राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की 2017 ला आमच्याकडून चूक झाली. तत्पूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव राजभवनावर दाखल झाले. तिथे त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची हिंदुस्तान आवाम मोर्चा (हम) देखील एनडीएतून बाहेर पडलाय. जीतन राम मांझी हे महाआघाडीला समर्थन देणार आहेत.

‘भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळला’

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बैठक केली. जोपर्यंत आम्ही भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळला. आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या सहमतीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वच नेत्यांची इच्छा होती की भाजपपासून वेगळं व्हावं, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.