HIV : एचआयव्ही संसर्गाच्या बिहार तिसरा तर मग महाराष्ट्राची काय स्थिती?
मुंबई : देशात सध्या कोरोनाने (Corona) अनेकांच्या समोर समस्या उभ्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हैराण झालेल्या जनतेला काही दिवसांपुर्वीच दिलासा मिळाला असून कोरोनाचे सगळे नियम हटले आहेत. राज्यातील जनजीवन पुर्वपदावर येत आहे. त्याचदरम्यान देशात आणि राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे समोर आले असून लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. मधल्या देन वर्षांत कोरोनामुळे […]
मुंबई : देशात सध्या कोरोनाने (Corona) अनेकांच्या समोर समस्या उभ्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हैराण झालेल्या जनतेला काही दिवसांपुर्वीच दिलासा मिळाला असून कोरोनाचे सगळे नियम हटले आहेत. राज्यातील जनजीवन पुर्वपदावर येत आहे. त्याचदरम्यान देशात आणि राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे समोर आले असून लोकांची चिंता पुन्हा वाढली आहे. मधल्या देन वर्षांत कोरोनामुळे इतर आजारांचे प्रमाण ही वाढले आहे. मात्र त्याकडे इतके कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र राज्याचे टेंशन वाढवणारी बाब समोर आली आहे. राज्यातील HIV बाधीतांची संख्या वाढत आहे. एचआयव्ही संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशनंतर बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP) याबाबत माहिती उघड झाली असून राज्यात HIV चे प्रमाण STD रूग्णांमध्ये 18.4% आणि ANC मध्ये 1.8% आहे.
आरोग्य समस्या
एचआयव्ही/एड्स ही राज्यातील एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. अंदाजे 7.47 लाख एचआयव्ही बाधित लोकांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NACP) मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात HIV चे प्रमाण STD रूग्णांमध्ये 18.4% आणि ANC मध्ये 1.8% आहे. तर महाराष्ट्रातील 61% स्त्रियांनी एड्सची माहिती स्त्रियांनी ऐकले आहे,.जे राष्ट्रीय स्तरावरील 100 पैकी 40 टक्के जास्त आहे. तथापि, दर 5 पैकी 2 महिला याची माहिती नाही. ग्रामीण भागातील 47% च्या तुलनेत शहरी भागातील (81 टक्के) महिलांनी एड्सबद्दल ऐकले आहे.
महाराष्ट्रानंतर बिहारचा नंबर
तर महाराष्ट्रानंतर बिहारचा नंबर लागतो. याबाबत युनिसेफ (बिहार) हेल्थ स्पेशलिस्ट डॉ. एस. सिद्धार्थ शंकर रेड्डी यांनी एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमादरम्यान सांगितले की, 2010 पासून एचआयव्ही संसर्ग दरात 27 टक्के घट होऊनही बिहारमध्ये ही परिस्थिती आहे. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) द्वारे 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्यात पीएलएचआयव्ही ग्रस्त तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, एचआयव्हीची नवीन प्रकरणे अधिक लोक आहेत. जे इंट्राव्हेनस ड्रग्स वापरतात किंवा समलैंगिक संबंध किंवा पुरुषाशी लैंगिक संबंध (एमएसएम) मध्ये रस घेतात.
संसर्ग होण्याचा ट्रेंड
डॉ. रेड्डी म्हणाले की, महिला सेक्स वर्कर्समध्ये संसर्ग होण्याचा ट्रेंड आता (MSM) मध्ये बदलला आहे. या प्रकरणात, ट्रक चालक आणि स्थलांतरित कामगार हे एचआयव्हीच्या संपर्कात येण्यासाठी सर्वात असुरक्षित गट होते. बिहारमध्ये PLHIV चा संसर्ग दर (0.17%) राष्ट्रीय सरासरीपेक्षा (0.22%) चांगला असला तरी, 2030 पर्यंत सार्वजनिक स्तरावर या रोगाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे आम्हाला HIV जनजागृती मोहिमेचा कालावधी वाढवावा लागला. 220-21 च्या दरम्यान 5,77,103 जनांची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. ज्यात 1.12 टक्के (6,469) लोक पॉजीटिव्ह आढळले. यापूर्वी 2019-20 मध्ये 8,51,346 लोकांची चाचणी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 1.16 टक्के (9,928) एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले होते.
एचआयव्ही बाधीतांची संख्या
तर हातात आलेली आकडेवारी हेच सांगते की, बिहारमध्ये एचआयव्ही बाधीतांची संख्या कमी होत आहेत. बिहार स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीचे प्रोजेक्ट डायरेक्टर अंशुल अग्रवाल यांनी सांगितले की, 2018-19 मध्ये 6 लाख लोकांपैकी 1.83 टक्के (11,000) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2021-22 मध्ये फेब्रुवारीपर्यंत 6,87,439 पैकी 0.91 टक्के (7,139) लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
एचआयव्हीबद्दल जागरूक केले पाहिजे
युनिसेफ (बिहार) च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख नफिसा बिंते शफीक यांनी सांगितले की, एचआयव्हीच्या प्रतिबंधासाठी तीन स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रथम, लोकांना एचआयव्हीबद्दल जागरूक केले पाहिजे. याशिवाय PLHIV विरुद्ध भेदभाव किंवा सामाजिक कलंक यासारख्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच, संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांमध्ये एचआयव्ही चाचणी आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
राज्यातील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी
अंशुल अग्रवाल म्हणाले की, या आजाराविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेमुळे राज्यातील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. बिहारमध्ये सुमारे 1.34 लाख संक्रमित लोक आहेत. जे देशातील एड्सच्या एकूण प्रकरणांपैकी 5.77 टक्के आहे.
इतर बातम्या :