बापरे! बिहारमध्ये वीज पडून 33 लोकांनी गमावला जीव, वीज कोसळून मोठी जीवितहानी
Bihar Storm Lighting in Rain killed 33 people : वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार : बिहारमध्ये (Bihar News) 33 लोकांचा वीज पडून मृत्यू (Death after lighting) झाला आहे. प्रचंड गरमीनंतर आलेल्या अस्नामी संकटानं बिहारमधील 33 लोकांचा जीव घेतल्यानं एकच खळबळ उडाली. काही तास झालेल्या मुसळधार पावसानं बिहारमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. वादळासारख्या झालेल्या पावसानं विजांच्या कडकडाटासह तब्बल 33 लोकांचा जीव घेतलाय. वीज कोसळलून 16 जिल्ह्यांमधील 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता बिहार सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitin Kumar) यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, आता मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आला य. बिहारच्या भागलपूर या भागात सर्वाधित नुकसान झालंय. एकट्या भागलपूर भागात सात लोकांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर मुजफ्फरपूरमध्ये 6 जण दगावलेत. गुरुवारी दुपारी बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या बिहारमधील पावसानं सगळ्यांची दाणादाण उडवली होती.
बिहार के कई जिलों में आंधी एवं बिजली गिरने की घटनाओं में कई लोगों की मृत्यु से अत्यंत दुख हुआ है। ईश्वर शोक-संतप्त परिवारों को इस अपार दुख को सहने की शक्ति दे। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन राहत और बचाव कार्य में तत्परता से जुटा है।
हे सुद्धा वाचा— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2022
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुसळधार पावसानंतर बिहारचं जनजीवन प्रभावित झालंय. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपयांची घोषणा करताना 33 लोकांचा मृत्यू वीज कोसळून झाली असल्याची माहिती दिली . 33 जणांच्या मृत्यूबाबत नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच ज्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे, त्यांनादेखील तत्काळ नुकसान भरपाई दिली जावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
राज्य के 16 जिलों में आंधी एवं वज्रपात से 33 लोगों की मृत्यु दुःखद। मृतकों के आश्रितों को तत्काल 4-4 लाख रु० अनुग्रह अनुदान देने तथा आंधी एवं वज्रपात से हुई गृह क्षति एवं फसल क्षति का आकलन कर प्रभावित परिवारों को जल्द से जल्द सहायता राशि उपलब्ध कराने का निर्देश भी दिया गया। (1/2)
— Nitish Kumar (@NitishKumar) May 20, 2022
पाहा Video : नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
सतर्कतेचं आवाहन
वातावरणातील बदलाचा मोठा फटका बिहारला बसलाय. अस्मानी संकटामुळे 33 लोकांनी जीव गमावल्यानंतर आता प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणेनं केलेल्या आवाहनाला लोकांनी सहकार्य करावं. तसंच गरज नसेल, तर घरातच थांबावं, अशा सूचना केल्या गेल्यात.
शेतमालाच्या नुकसानीची भीती
सुरुवातीला वीज कोसळून किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी समोर आलेली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करत वाईट हवामानामुळे 33 जणांचा जीव घेतल्याची माहिती दिली. धुव्वाधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. बिहारमधील प्रशासनाकडून आता नुकसान झालेल्यांसाठी बचावकार्य करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारमधील घटनेबाबत खेद व्यक्त केलाय.