ध्वजारोहणानंतर तब्यत बिघडली, सुलभ इंटरनॅशनलच्या संस्थापकांचा मृत्यू
मैला फेकणाऱ्या लोकांसाठी बिंदेश्वर पाठक यांनी लढाई लढली. सुलभने १.३ मिलीयन घरेलू शौचालय आणि ५४ मिलीयन सरकारी शौचालय निर्माण केले.
नवी दिल्ली : सुलभ इंटरनॅशनलचे (Sulabh International) संस्थापक बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांची अचानक तब्यत बिघडली. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. उद्या, बुधवारी सकाळी सात वाजता सुलभ म्युझीयम येथे दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. बिंदेश्वर पाठक यांनी समाजसुधारणा केली.
सुलभ संघटना २७५ कोटींचा
मैला फेकणाऱ्या लोकांसाठी बिंदेश्वर पाठक यांनी लढाई लढली. सुलभने १.३ मिलीयन घरेलू शौचालय आणि ५४ मिलीयन सरकारी शौचालय निर्माण केले. बिंदेश्वर पाठक सुलभ इंटरनॅशनल संघटन २७५ कोटी रुपयांचा झाला. या संघटनेमध्ये सुमारे ६० हजार लोकं जुळले. मैला फेकणाऱ्या लोकांसाठी बिंदेश्वर पाठक यांनी लढा दिला.
बायोगॅस प्लँट विकसित केले
२००३ मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी राजस्थानातील अलवर येथे एक सेंटर सुरू केले. तिथं महिलांना शिलाई मशीन, अन्न प्रक्रिया उद्योग, सौंदर्य उपचार असे प्रशिक्षण दिले. जुलै २०११ मध्ये कमी दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या २०० महिलांसह त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. तिथं त्यांनी ब्राम्हण आणि उच्च जातीच्या लोकांसोबत जेवण केलं. पाठक यांनी बायोगॅस विकसित केला. स्वयंपाक करणे तसेच विजेच्या निर्मितीसाठी हा बायोगॅस वापरला जात होता.
या लोकांसाठी लढली लढाई
बिंदेश्वर पाठक हे ८० वर्षांचे होते. पाठक यांनी मैला फेकणाऱ्या लोकांसाठी मोठी लढाई लढली. समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे पाठक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहिले जात होते. परंतु, ध्वजारोहणानंतर आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली. एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यामुळे मैला फेकणाऱ्या लोकांचा फार मोठा आधार गेला.
बिंदेश्वर पाठक यांचा मृतदेह उद्या, बुधवारी सकाळी सहा वाजता महावीर एन्क्लेव्ह येथील सुलभ ग्राम येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पाठक यांच्या मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. देशाची अपरीमीत हानी झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी पाठक यांचे फार मोठे योगदान होते, असंही मोदी म्हणाले.