कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचं मोठं संकट; केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याची वेळ
बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते. | Bird Flu H5N8
मुंबई: कोरोनाच्या साथीला उतार पडत नाही तोच आता महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट ओढावण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्य बर्ड फ्लू ची (Bird Flu H5N8) साथ पसरली आहे. या साथीत आतापर्यंत हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Kerala On High Alert As Bird Flu Scare Escalates 40 Thousand Birds To be Culled)
स्थलांतरित पक्षी, कावळे आणि कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
राजस्थानात आतापर्यंत 245 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशात आलेले 1700 स्थलांतरित पक्षी या साथीमुळे मृत्यूमुखी पडले. परिणामी हिमाचल प्रदेशात चिकन आणि अंडी सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही कोंबडी आणि कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंडमधील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 40 हजार पक्ष्यांना मारण्याचे आदेश
केरळच्या कोट्टायम आणि अलप्पुझा जिल्ह्यातील काही भागांत बर्ड फ्लू (H5N8) वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली.
कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते.
Bird Flu has been detected in four samples of dead crows sent to the state lab. Around 100 crows died in Mandsaur between 23rd Dec & 3rd Jan. Medical team to conduct surveillance within 1-km of the infected area: Dr Manish Ingole, Animal Husbandry Dept, Mandsaur, #MadhyaPradesh https://t.co/WPWvTq3Fyq pic.twitter.com/8PuYuFzW8E
— ANI (@ANI) January 5, 2021
पोंग बांध अभयारण्यात 1800 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील पोंग बांध जलाशयाच्या परिसरात असणाऱ्या अभयारण्यात 1800 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला. या सर्व पक्ष्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हिमाचल प्रदेशात चिकन आणि अंड्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
केरळमध्येही यंदा तब्बल 50 हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यापैकी काही पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. राज्यातील इतर पाणथळ प्रदेशांत पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. मात्र, केरळमध्ये वन्यजीव आणि पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2016 मध्ये केरळमध्ये बर्ड फ्लूची मोठी साथ आली होती.
संबंधित बातम्या:
मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी
(Kerala On High Alert As Bird Flu Scare Escalates 40 Thousand Birds To be Culled)