भाजपकडून 4 राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर, केरळमध्ये मेट्रो मॅन ‘या’ मतदारसंघातून निवडणूक रिंगणात
भाजपने यापैकी 4 राज्यातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भारतात 'मेट्रो मॅन' म्हणून ओळख असलेल्या ई श्रीधरण यांच्या मतदारसंघाचीही घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : सध्या देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज (14 मार्च) भाजपने यापैकी 4 राज्यातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भारतात ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळख असलेल्या ई श्रीधरण यांच्या मतदारसंघाचीही घोषणा करण्यात आली. ते केरळमधील पलक्कड येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे (BJP announces candidate list for Assembly Election of Keral West Bengal Tamilnadu and Assam).
भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी आज (14 मार्च) पत्रकार परिषद घेत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममधील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
तामिळनाडू
In Tamil Nadu, BJP is contesting as NDA partner & we’ll be contesting in 20 Assembly constituencies spread across all regions of the state. State president L Murugan will contest from Dharapuram. Senior leader H Raja will contest from Karaikudi: BJP national gen secy Arun Singh pic.twitter.com/wiyKsou2gh
— ANI (@ANI) March 14, 2021
अरुण सिंह म्हणाले, “शनिवारी (13 मार्च) केंद्रीय निवडणूक समितीचs बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तामिळनाडूत भाजप 20 विधानसभा जागांवर निवडणूक लढणार आहे.” तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष एल मुरुगन धारापुरम आणि एच. राजा कराईकुडीमधून निवडणूक लढणार आहेत. कोयंबटूर दक्षिणमधून वनाथी आणि अभिनेत्री खुशबू सुंदर थाऊजंड लाईट्समधून निवडणूक लढणार आहे.
केरळ
मेट्रो मैन ई.श्रीधरण पलक्कड़ से चुनाव लड़ेंगे: अरुण सिंह, भाजपा राष्ट्रीय महासचिव https://t.co/gaD5HbovyM
— ANI_HindiNews (@AHindinews) March 14, 2021
केरळमध्ये भाजपने BDJS, AIDMK, जेआरएस, कामराज काँग्रेससोबत युती केलीय. केरळमध्ये भाजप एकूण 115 जागांवर निवडणूक लढत आहे. इतर 25 जागांवर या 4 पक्षांना देण्यात आल्यात. एलडीएफ आणि यूडीएफचे अनेक कार्यकर्ते, सेलेब्रिटी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचंही सांगितलं जातंय. यंदा केरळमध्ये आयपीएस अधिकारी, सेलीब्रिटी आणि प्रशासकीय अधिकारी निवडणूक रिंगणात आहेत.
आसाम
असम विधानसभा चुनाव के लिए भाजपा ने 17 उम्मीदवारों की सूची जारी की। pic.twitter.com/Zdsmmk3J9N
— ANI_HindiNews (@AHindinews) March 14, 2021
अरुण सिंह म्हणाले, “आसाममध्ये भाजप 92 जागांवर निवडणूक लढेल आणि इतर जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढतील. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 17 उमेदवारांची यादी जाहीर केलीय.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल में तीसरे चरण की 31 में से 27 सीटों और चौथे चरण की 44 सीटों में से 36 सीटों पर आज हम प्रत्याशियों की घोषणा कर रहे हैं। अर्थशास्त्री अशोक लहरी अलीपुरद्वार से भाजपा के प्रत्याशी होंगे: अरुण सिंह, बीजेपी pic.twitter.com/m8j0Li3MDm
— ANI_HindiNews (@AHindinews) March 14, 2021
पश्चिम बंगालबाबत अरुण सिंह म्हणाले, “तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीच्या 31 पैकी 27 जागा आणि चौथ्या टप्प्यासाठी 44 जागांपैकी 36 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.
हेही वाचा :
Mamata banerjee Injured : ममता बॅनर्जींचे सुरक्षा संचालक निलंबित, जिल्हाधिकारी आणि एसपींवरही कारवाई
Assam Election 2021 : ‘हिंसा हवी की शांती, घुसखोरी हवी की विकास?’ अमित शाहांचा मतदारांना सवाल
व्हिडीओ पाहा :
BJP announces candidate list for Assembly Election of Keral West Bengal Tamilnadu and Assam