‘एनडीए’तून शिवसेनेला बाहेरचा रस्ता, भाजपकडून विरोधी बाकांवर सोय
भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा (Opposition seats to Shivsena) देत एनडीएच्या बाहेरचा (Shivsena out of NDA) रस्ता दाखवला आहे.
नवी दिल्ली: भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा (Opposition seats to Shivsena) देत एनडीएच्या बाहेरचा (Shivsena out of NDA) रस्ता दाखवला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत आज घोषणा केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा भाजपकडून पहिल्यांदाच अधिकृत शेवट करण्यात आला आहे.
प्रल्हाद जोशी म्हणाले, “शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकांना हजर राहत नव्हती. त्यांचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून त्यांनीच विरोधीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीबाकावर जागा दिली आहे.
Pralhad Joshi, Union Minister: Shiv Sena is not coming to NDA meeting. Their minister Arvind Sawant has resigned. They’re trying to work with Congress, so naturally, they’ve opted to sit in opposition & we’ve agreed to that. We’re allotting them seat in opposition both in LS & RS pic.twitter.com/lFlbjCxu3U
— ANI (@ANI) November 17, 2019
दरम्यान, शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणच नाही. त्यामुळे शिवसेना बैठकीला जाणार नाही, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपने शिवसेना एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याचं सांगत त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी बाकावर जागा दिली आहे.