जे. पी. नड्डा यांचा 120 दिवसांचा देशभर प्रवास, भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं!
बिहारचा गड काबीज केल्यानंतर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
नवी दिल्ली : बिहारचा (Bihar Election) गड काबीज केल्यानंतर भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण सिंह (Arun Singh) यांनी पत्रकार परिषद घेऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तयारीला आम्ही लागलो असल्याचं सांगितलं आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (BJP has started preparations for the 2024 Lok Sabha elections Says Arun Singh)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देशात 120 दिवस प्रवास करणार आहेत. भाजप संघटनेला मजबूत करण्यासाठी नड्डा देशभर प्रवास करतील. प्रत्येक बूथ आणि मंडळ कार्यकर्त्याला यादरम्यान ते संबोधित करतील, अशी माहिती अरुण सिंह यांनी दिली आहे.
भाजपच्या योजना कुठं पर्यंत पोहचल्या याचा आढावा पक्षाध्यक्ष म्हणून नड्डा घेणार आहेत तसंच जिथं नाही पोहचल्या तिथं पोहचवण्यासाठी हा प्रवास असल्याचं देखील अरुण सिंह म्हणाले. या यात्रेत बुद्धिजीवी, विशेष वर्गाच्या लोकांशी खास करुन पक्षाध्यक्ष संवाद साधतील तसंच यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी नड्डा पत्रकार परिषद घेऊन त्यावेळच्या परिस्थितीचं विश्लेषण करतील, असंही अरुण सिंह यांनी सांगितलं.
जेथे भाजपची सत्ता आहे त्या त्या संबंधित राज्यात आपल्या कामाचा प्रेझेन्टेन्शन स्वत: पक्षाध्यक्ष देतील, असंही अरुण सिंह यांनी सांगितलं. 5 डिसेंबरपासून उत्तराखंडमधून ही यात्रा सुरु होईल, जी पुढे 120 चालेल. A B C प्रमाणे देशयात्रेचे नियोजन केले आहे. जे राज्य मोठे आहे तिथे जे. पी. नड्डा 3 दिवस थांबतील. इतर ठिकाणी 2 दिवस थांबतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
बिहार निवडणुकीतील यशानंतर भाजचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. येत्या वर्षभरात देशातील पाच विधानसभा निवडणुका देखील होत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये पुढील वर्षी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आणखी केलेली दिसून येत आहे.
(BJP has started preparations for the 2024 Lok Sabha elections Says Arun Singh)
संबंधित बातम्या
बिहारनंतर पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूक, भाजपपुढे ‘या’ दोन राज्यांमध्ये कडवं आव्हान