By Election Result 2022 : पोटनिवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये पिछाडीवर; शॉटगन शत्रुघ्न सिन्हा तर बाबुल सुप्रियो आघाडीवर
By Election Results 2022 : एक लोकसभा (Lok Sabha) आणि चार विधानसभा (Vidhan Sabhas) जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (Election results 2022) आज घोषित होत आहेत. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका […]
By Election Results 2022 : एक लोकसभा (Lok Sabha) आणि चार विधानसभा (Vidhan Sabhas) जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (Election results 2022) आज घोषित होत आहेत. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येत आहेत. यादरम्यान अख्या देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर लागून राहीले आहे. कारण या दोन्ही जागांवर आधी भाजपचे असणारे चेहरे भाजपविरोधातच निवडणूकीत उतरले आहेत. सध्याचे हाती येणारे निकाल पाहता देशात पाच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत चार ठिकाणी घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपची मात्र या पोटनिवडणुकीत पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे 4 राज्यांमधील 4 विधानसभा आणि एका लोकसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेवर (TMC) चे शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहेत. तर भाजपचे (BJP) अग्निमित्र पॉल मागे पडले आहेत. बिहारच्या बोचाहान जागेवरही भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. जिथून आरजेडीचे अमर पासवान सातत्याने आघाडीवर आहेत. छत्तीसगडमधील खैरागड जागेवरही भाजप पिछाडीवर असून काँग्रेस आघाडीवर आहे. याशिवाय महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातूनही काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील बालीगंगे जागेवर टीएमसीचे बाबुल सुप्रियो आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगाल मधील आसनसोल लोकसभेच्या पोटनिवडणुकीत टीएमसीने शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली. तर भाजपने अग्निमित्रा पॉल यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली. बालीगंगे विधानसभेसाठी टीएमसीने बाबुल सुप्रियो यांना पसंती दिली. यावेळी पक्षाचे उमेदवार बाबुल सुप्रियो म्हणाले, मला खात्री आहे. येथे 41% मतदारांनी खोट्या मतदानाचा विरोधकांचा अनावश्यक दावा नाकारला. तसे असते तर इतकी मते पडली असती का? पश्चिम बंगालच्या दीदी टीएमसीसोबत आहेत. आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा हे 144088 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा यांना 339136 मते मिळाली आहेत. ते 90372 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या अग्निमित्रा पाल यांना 195048 मते मिळाली आहेत. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पार्थ मुखर्जी यांना 45136 मते मिळाली आहेत.
दरम्यान बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो 9105 मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 18874 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 3047, भाजपच्या काया घोष यांना 1744 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 9769 मते मिळाली.