36 हजार मंदिर पाडून मशिद बांधल्या, कर्नाटकचे भाजप नेते ईश्वरप्पा यांचा दावा, हिजाबबरोबर मशिदीचाही वाद
कर्नाटकात पुन्हा एकदा मंदिर-मशीद वाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांनी आज या संदर्भात धक्कादायक दावा केला. ते म्हणाले की, देशातील 36 हजार मंदिरं ही उद्ध्वस्त करून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. आता मंदिर उभारणीसाठी कायदेशीर लढाई लढली जाणार.
बंगळूरू : देशातील वातावरण हे मंदिर-मशिदीवरून (Mandir-Masjid) चांगलच तापत आहे. तर मंदिर-मशिदीवरून नवनवे वाद समोर येत आहेत. इतिहासातील पाळेमुळे खोदले जात असून मशिदींवर हक्क सांगितले जात आहेत. असेच हक्क ज्ञानवापी मशीद, मथूरेतील शाही ईदगाह, कुतूबमिणार, ताजमहल आणि राजस्थानच्या अजमेरमधील हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्गा यावरही करण्यात आले आहे. हे असे वातावरण असताना तेलंगणाच्या (Telangana) भाजप प्रमुख बी संजय कुमार यांनी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, राज्यातील सर्व मशिदींचे उत्खनन करू. उत्खननात मृतदेह सापडला तर तुमचा आणि शिवलिंग सापडलं तर आम्ही घेऊ. याविधानावरून वादंग सुरू असतानाच कुमार यांची री कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार केएस ईश्वरप्पा (BJP MLA KS Ishwarappa) यांनी ओढली आहे. ते म्हणाले देशातील 36 हजार मंदिरे पाडण्यात आली आणि त्यावर मशिदी बांधण्यात आल्या. यामुळे कर्नाटक पाठोपाठ आता तेलंगणात राजकीय वातावरण तापलं आहे.
36,000 temples have been destroyed and masjids were built over it. Let them build mosques elsewhere and offer namaz, but we cannot allow them to build masjids over our temples. All the 36000 temples will be reclaimed by Hindus legally: Karnataka BJP MLA KS Eshwarappa pic.twitter.com/KWLla052N6
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 27, 2022
कर्नाटकात पुन्हा एकदा मंदिर-मशीद वाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे भाजप आमदार केएस ईश्वरप्पा यांनी आज या संदर्भात धक्कादायक दावा केला. ते म्हणाले की, देशातील 36 हजार मंदिरं ही उद्ध्वस्त करून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. आता मंदिर उभारणीसाठी कायदेशीर लढाई लढली जाणार. आ. ईश्वरप्पा म्हणाले की मशिदी इतरत्र बांधण्यास सांगितले जाईल आणि नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाईल, परंतु ते मंदिराऐवजी मशीद बांधू देऊ शकत नाहीत. सर्व 36000 मंदिरे कायदेशीररीत्या ताब्यात घेतली जातील, असेही यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मंदिरे पाडल्यानंतर त्यावर मशिदी बांधण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र मशिदींवर मंदिरे बांधण्यास परवानगी देण्यात आली नाही.
मंड्या प्रशासनास निवेदन देण्यात आलं
त्याचबरोबर दक्षिणपंथी संघटनेने मंड्या प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. ज्यात म्हटलं आहे की, मशिदीत पुजा करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच संघटनेने आरोप केला आहे की, ती मशीद हनुमान मंदिर तोडून त्यावर बनविण्यात आलं आहे. तर तेथे आजही हिंदु देवी-देवतांच्या मुर्त्या आहेत. तर असं म्हटं जात की, जामिया मशीद मैसुरचा राजा टीपू सुलतानने बनवली आहे. ही त्यावेली चर्चा सुरू होती जेव्हा हिंदु संघटनांकडून 16 एप्रैल दिवशी हनुमान जयंतीनिमित्त 6 लाख नागरिक श्रीरंगपटना जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
जामिया मशिदीला मस्जिद-ए-आला अशा नावानेही ओळखले जाते. ही 1786-1787 ला बनवण्यात आली होती. ज्याला दोन टॉवर आहेत. जे एका चबुतऱ्यावर बविण्यात आली आहेत. तर टॉवरला प्रत्येक मजल्यावर एक बाल्कनी आहे. तर इतर मशिदींप्रमाणे या मशीदीला घुमट नाही.