Rajya Sabha : लोकसभेतच नाही तर राज्यसभेत पण सत्ताधाऱ्यांना ‘बहुमत’; भाजप करणार असा रेकॉर्ड ब्रेक

BJP Majority in Rajya Sabha : लोकसभेत तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे. लोकसभेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. आता राज्यसभेत पण मोठा उलटफेर पाहायला मिळेल. बहुमताचा येथे पण दबदबा असेल.

Rajya Sabha : लोकसभेतच नाही तर राज्यसभेत पण सत्ताधाऱ्यांना 'बहुमत'; भाजप करणार असा रेकॉर्ड ब्रेक
राज्यसभेत पण भाजप गाठणार बहुमताचा आकडा
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 9:44 AM

लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केली. संख्याबळानुसार, भाजप हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. आता राज्यसभेत पण एनडीएचे बहुमत दिसेल. लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ सभागृहातील काही सदस्य निवडून आले. त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. लवकरच या जागांवर निवडणूक होईल. एनडीए लवकरच बहुमत गाठेल. सध्या राज्यसभेत एनडीएच्या सदस्यांची संख्या 110 आहे. तर 10 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यानंतर राज्यसभेत एकूण सदस्यांची संख्या पुन्हा 240 इतकी होईल. तर एनडीएची सदस्य संख्या 120 इतकी होईल. भाजप पहिल्यांदाच राज्यसभेत 99 हा आकडा पार करेल.

विरोधकांच्या हाती किती जागा?

रिक्त जागांपैकी सत्ताधाऱ्यांच्या 7 तर विरोधकांच्या हाती 3 जागा आहेत. यामध्ये काँग्रेसच्या दोन तर राष्ट्रीय जनता दलाची एक जागा आहे. सर्व जागा या विविध राज्यातील विधानसभा कोट्यातील आहेत. निवडणुकीनंतर या जागा सत्ताधाऱ्यांच्या गोटात येतील. राजस्थानमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांची एक जागा पण भाजपकडे येईल. बिहार, महाराष्ट्र आणि आसाममधील प्रत्येकी दोन जागा तर त्रिपुरा, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील प्रत्येकी एक जागा आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोग लवकरच करेल घोषणा

निवडणूक आयोग या 10 रिक्त जागी निवडणुकीची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर होईल. राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्या 250 इतकी आहे. यामध्ये 238 सदस्यांची विविध राज्यातील विधानसभा सदस्यातून निवड होते.तर 12 सदस्यांची निुयक्ती राष्ट्रपती करतात. यामध्ये कला, साहित्य, सामाजिक सेवेत सक्रिय काम करणाऱ्यांचा समावेश असतो. काही जागा रिक्त असल्याने राज्यसभेत 240 सदस्य होते. त्यातही 10 जागा रिक्त झाल्याने ही सदस्य संख्या आता 230 वर आली आहे. यामध्ये भाजपचे 90 सदस्य आहेत. यामध्ये 5 नामनिर्देशीत सदस्य पण आहेत.

या जागा झाल्या रिक्त

आसाम – कामाख्या प्रसाद तासा आणि सर्बानंद सोनोवाल

बिहार – मीसा भारती आणि विवेक ठाकूर

महाराष्ट्र – उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल

हरियाणा – दीपेंद्र सिंह हुड्डा

मध्य प्रदेश – ज्योतिरादित्य शिंदे

राजस्थान – केसी वेणुगोपाल

त्रिपुरा – बिप्लब कुमार देब

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.