मोदींचे हात आणखी बळकट, या सहा पक्षांचा भाजपसोबत लढण्याचा निर्णय

नवी दिल्ली : ईशान्य भारतात नागरिकत्व संशोधन विधेयकामुळे भाजपविरोधात वातावरण तयार झालं होतं. पण लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच हे वातावरण निवळल्याचं दिसतंय. कारण, लोकसभेसाठी ईशान्य भारतात सहा प्रादेशिक पक्षांनी एनडीएसोबत निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय. भाजपचे महासचिव राम माधव यांनी मंगळवारी दिमापूर आणि गुवाहटीमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यामध्ये नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद […]

मोदींचे हात आणखी बळकट, या सहा पक्षांचा भाजपसोबत लढण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : ईशान्य भारतात नागरिकत्व संशोधन विधेयकामुळे भाजपविरोधात वातावरण तयार झालं होतं. पण लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच हे वातावरण निवळल्याचं दिसतंय. कारण, लोकसभेसाठी ईशान्य भारतात सहा प्रादेशिक पक्षांनी एनडीएसोबत निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय. भाजपचे महासचिव राम माधव यांनी मंगळवारी दिमापूर आणि गुवाहटीमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यामध्ये नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि एनईडीएचे संयोजक हेमंत बिस्वा सरमा यांच्यासोबत मॅराथॉन बैठका घेत महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

सर्व नेत्यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. काँग्रेसला हरवण्यासाठी भाजप, एनपीपी, एनडीपीपी, आसाम गण परिषद (एजीपी) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) असम, नागालैंड, मेघालय, मणिपुर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकत्र निवडणूक लढतील. त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आयपीएफटी आमच्यासोबत असल्याचं राम माधव म्हणाले. ईशान्य भारतातील 25 जागांपैकी 22 जागा आम्ही जिंकू, असा दावाही त्यांनी केला.

नेफ्यू रियो नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी म्हणजेच एनडीपीपीचे अध्यक्ष आहेत, तर नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजेच एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा हे आहेत. ईशान्य भारतातली जबाबदारी हेमंत बिसवा सरमा यांच्यावर आहे.

2014 च्या निवडणुकीनंतर भाजपने आतापर्यंत आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये भाजप मित्रपक्षासह सत्तेत आहे. 2014 आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीपूर्वी आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तर त्रिपुरामध्ये डाव्यांचा दबदबा होता. पण 2014 नंतर हे समीकरणं मोडित काढत भाजपने सत्ता मिळवली. ईशान्य भारतात काँग्रेसकडे सध्या एकही राज्य नाही.

ईशान्य भारतातील 25 जागांवर निवडणूक कधी?

त्रिपुरा (2 जागा)

पहिला टप्पा, 11 एप्रिल

दुसरा टप्पा, 18 एप्रिल

मणिपूर (2 जागा)

पहिला टप्पा, 11 एप्रिल

दुसरा टप्पा, 18 एप्रिल

आसाम (14 जागा)

पहिला टप्पा, 11 एप्रिल

दुसरा टप्पा, 18 एप्रिल

तिसरा टप्पा, 23 एप्रिल

मेघालयच्या दोन, नागालँडची एक, मिझोरम एक, अरुणाचल प्रदेशच्या दोन आणि सिक्कीमच्या एका जागेवर 11 एप्रिल रोजी मतदान होईल.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं?

2014 च्या लोकसभा भाजपप्रणित एनडीएमधील नागा पीपल्स फ्रंटने एक, मेघालय नॅशनल पीपल्स फ्रंटने एक आणि सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटने एक अशा एकूण अकरा जागा जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपने आसाममध्ये सात आणि अरुणाचलमध्ये एका जागेवर विजय मिळवला होता.

काँग्रेसने आसाममध्ये तीन, मणिपूरमध्ये दोन, अरुणाचल प्रदेश-मेघालयात प्रत्येकी एक-एक जागेवर विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणुकीत आसाममध्ये एआययूडीएफने तीन, त्रिपुरात सीपीआयएमने दोन जागा मिळवल्या होत्या.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.