आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवण्याचं षडयंत्र, भाजप आमदाराचा वादग्रस्त VIDEO

भाजप आमदार मदन दिलावर यांनी शेतकरी चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवत असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. (Madan Dilawar)

आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरवण्याचं षडयंत्र, भाजप आमदाराचा वादग्रस्त VIDEO
मदन दिलावर, भाजप आमदार राजस्थान
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 11:17 AM

दिल्ली: राजस्थानातील भाजप आमदार(BJP MLA) मदन दिलावर (Madan Dilawar) यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी (Farmer Potest) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “देशभरात बर्ड फ्लूचा फैलाव व्हावा म्हणून आंदोलक शेतकरी चिकन बिर्याणी खातात”,असं वादग्रस्त वक्तव्य मदन दिलावर यांनी केले आहे. “काही तथाकथित शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी कोणत्याही आंदोलनातर सहभागी झाले नाहीत तर ते चिकन बिर्याणी आणि ड्राय फ्रूटस खात आहेत, हे बर्ड फ्लू फैलावण्याचं षडयंत्र आहे” असं धक्कादायक वक्तव्य मदन दिलावर या भाजप आमदारानं केलं आहे. (BJP MLA Madan Dilawar said Protesting Farmers eating Biryani to Spread Bird Flu)

रामगंज मंडीचे आमदार मदन दिलावर यांनी ” आंदोलन करणाऱ्या तथाकथित शेतकऱ्यांमध्ये दहशतवादी, चोर आणि लुटेरे असू शकतात. जे शेतकऱ्यांचे दुश्मन असू शकतात. हे सर्व जण मिळून देशाला बर्बाद करु पाहतात. जर सरकारनं आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर बर्ड फ्लू वाढण्यासाठी जबाबदार असतील”, असं म्हटलं.

शेतकरी नेत्यांचे प्रत्युत्तर

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी मदन दिलावर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. मदन दिलावर यांनी सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. अखिल भारतीय किसान महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष दुलीचंद बोरदा यांनी भाजप सुरुवातीपासून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी मदन दिलावर अशी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असा पलटवार शेतकरी नेत्यांनी केला आहे.

पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनाचा आज 47 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 8 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, कोणताही समझोता झालेला नाही. 15 जानेवारीला शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची 9 नी फेरी होणार आहे. अशा वेळी मदन दिलावर यांचं वक्तव्य चर्चेत अडथळा निर्माण करु शकतं. सिंघू, टिकरी बॉर्डर पूर्णपणे सील करण्यात आली आहे. गाजीपूर आणि चिल्ला बॉर्डर एका बाजूनं सील करण्यात आलीय.

शेतकरी नेत्यांचं ट्वीट

संबंधित बातम्या:

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

‘सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही’, शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

(BJP MLA Madan Dilawar said Protesting Farmers eating Biryani to Spread Bird Flu)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.