VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराने होळी समारंभातच कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली, बाबुल सुप्रियो नव्या वादात

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीने राजकीय पारा चांगलाच वाढवलाय. त्यातच आता भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी होळी समारंभात सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याने सुप्रियो यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. बंगालमधील टॉलीगंज येथे ही घटना घडलीय (BJP MP Babul Supriyo slapped party worker in Holi program […]

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराने होळी समारंभातच कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली, बाबुल सुप्रियो नव्या वादात
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 8:04 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीने राजकीय पारा चांगलाच वाढवलाय. त्यातच आता भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी होळी समारंभात सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या थोबाडीत लगावली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याने सुप्रियो यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. बंगालमधील टॉलीगंज येथे ही घटना घडलीय (BJP MP Babul Supriyo slapped party worker in Holi program for saying your are late).

खासदार बाबुल सुप्रियो आणि एका तरुण कार्यकर्त्यात बोलताना काहीसा वाद झाला आणि यानंतर सुप्रियो यांनी कोणताही विचार न करता थेट या कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली. विशेष म्हणजे हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद केल्याने सुप्रियो चांगलेच संतापले. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. पीडित युवकाने खासदार सुप्रियो यांच्यावर मारहाणीचा आरोप केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉलीगंज येथे रविवारी (28 मार्च) दुपारी 12 वाजता होळी समारंभ होता. यावेळी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो 12 वाजता येणार होते. मात्र, त्यांना कार्यक्रम स्थळी येण्यासाठी दुपारचे अडीच वाजले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. यावेळी तेथे माध्यम प्रतिनिधीही उपस्थित होते.

कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारण्यासारखं नेमकं काय झालं?

बाबुल सुप्रियो माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच एका कार्यकर्त्याने तुम्ही आधीच उशीरा आल्याचं सांगितलं. तसेच आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहात आहे, असं सुनावलं. यावर बाबुल सुप्रियो चांगलेच नाराज झाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्या कार्यकर्त्याला केवळ शांत बसण्यास सांगितले. मात्र, माध्यमांशी बोलून झाल्यानंतर त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यालयात नेले आणि थोबाडात लगावली.

TV9 ने ही मारहाणीची घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलीय. आपण मारहाण करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचं लक्षात येताच सुप्रियो यांनी पत्रकाराचा मोबाईल ओढून घेतला आणि बराच वेळ आपल्याकडेच ठेवला.

हेही वाचा :

प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला, विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की

अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी बाबुल सुप्रियोंसह 11 जणांचे मोबाईल चोरीला

जे महाराष्ट्रात घडत होतं, तेच बंगालमध्ये? शाहांची स्ट्रॅटेजी, भाजपात धूसफुस?

व्हिडीओ पाहा :

BJP MP Babul Supriyo slapped party worker in Holi program for saying your are late

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.