भाजप नेत्या रिटा बहुगुणा यांच्या नातीचा फटाके फोडताना अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

किया दिवाळीच्या निमित्ताने गच्चीवर फटाके फोडण्यासाठी गेली होती. (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi Granddaughter Died)

भाजप नेत्या रिटा बहुगुणा यांच्या नातीचा फटाके फोडताना अपघात, उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 1:56 PM

लखनौ (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील प्रयागराज मतदारसंघाच्या भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या आठ वर्षीय नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला आहे. किया जोशी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. फटाके फोडताना झालेल्या अपघातात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान कियाचा मृत्यू झाला. (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi Granddaughter Died Due to Firecracker)

रिटा बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांची 6 वर्षीय मुलगी किया दिवाळीच्या निमित्ताने गच्चीवर फटाके फोडण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. यावेळी फटाक्यांची ठिणगी तिच्या कपड्यांवर पडली आणि तिच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे किया गंभीररित्या भाजली.

यानंतर तिच्यासोबत खेळणाऱ्या मुला-मुलांनी आरडाओरडा सुरु केला. मात्र लहान मुलं खेळताना आपापसात ओरडत असावी, असा कुटुंबियांचा समज झाल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर काही वेळाने घरातील एक सदस्य गच्चीवर गेला असताना ही सर्व घटना समजली. त्यावेळी ती गंभीररित्या भाजली होती. यानंतर कियाला लगेचच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यावेळी डॉक्टरांनी कियाचे शरीर 60 टक्के भाजलं असल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तिच्यावर प्रयागराजमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र कियाची प्रकृती खालावत असल्याने तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र दिल्लीला हलवण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे रिटा बहुगुणा जोशी यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला आहे. यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi Granddaughter Died Due to Firecracker)

संबंधित बातम्या : 

Corona Vaccine : कोरोनाची लस 94.5 टक्के परिणामकारक, मॉडर्नाचा दावा

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.