Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदाराच्या घराबाहेर सुनेने हाताची नस कापली; मुलावर गंभीर आरोप

अंकिताने आपल्या पतीवर म्हणजे कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. | bjp mp kaushal kishore

भाजप खासदाराच्या घराबाहेर सुनेने हाताची नस कापली;  मुलावर गंभीर आरोप
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी अंकिताने एक व्हीडिओही शेअर केला होता. यामध्ये तिने मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. यानंतर अंकिता कौशल किशोर यांच्या दुबग्गा येथील घराबाहेर आली आणि हाताची नस कापून घेतली.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 8:22 AM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार कौशल किशोर यांच्या घरातील कौटुंबिक नाट्याने आता नवे वळण घेतले आहे. कौशल किशोर यांच्या सुनेने त्यांच्या घराबाहेर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. (bjp mp kaushal kishore son ayush wife ankita try to commit suicide)

कौशल किशोर हे मोहनलालगंज मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. याच वादातून त्यांची सून अंकिता हिने टोकाचे पाऊल उचलले. तिने कौशल किशोर यांच्या घराबाहेर येऊन स्वत:च्या हाताची नस कापली. यानंतर अंकिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अंकिताने आपल्या पतीवर म्हणजे कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी अंकिताने एक व्हीडिओही शेअर केला होता. यामध्ये तिने मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. यानंतर अंकिता कौशल किशोर यांच्या दुबग्गा येथील घराबाहेर आली आणि हाताची नस कापून घेतली.

‘मला सांगा, माझं काय चुकलं?’

अंकिता हिने सुसाईड नोटमध्ये कौशल किशोर यांच्या मुलावर आरोप केले आहेत. मी कोणाशी लढू शकत नाही कारण, माझे वडील खासदार नाहीत आणि आई आमदार नाही. माझं कोणीही ऐकून घेणार नाही. मी आजपर्यंत कोणालाही तुला हात लावू दिला नाही. तर मी तुला कशी मारु शकते? तू किती खोटं बोलत आहेस. तू आणि तुझ्या घरच्यांनी मला मरण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवलेला नाही, असे अंकिताने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

घराचं भाडं भरलं नाही, गॅस लावला नाही, तू एकदाही विचार केला नाहीस मी काय खाणार? तू माझ्याकडे येणार नसशील तर मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. मी जातेय. मी तुझ्या लक्षात राहिलेच तर तुला समजेल की तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम कोणीच केले नाही. माझ्या मृत्यूचे कारण तू आणि तुझ्या घरातील लोक आहेत, असेही अंकिताने म्हटले आहे.

योगी आदित्यनाथांना विनवणी

अंकिताने आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही मदत मागितल्याचे सांगितले. मात्र, कोणीही मला दाद दिली नाही. न्यायालयाकडूनही मला दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. मी आयुषशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. मात्र, मला त्याला भेटून दिले गेले नाही, असे अंकिताने म्हटले आहे.

(bjp mp kaushal kishore son ayush wife ankita try to commit suicide)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.