नवी दिल्ली | देशभरात आता लोकसभा निवडणुकीचा आखाडा मारण्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुक तोंडावर असताना भाजपने विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे घेत डॅमेज करायला सुरूवात केलीये. राम मंदिराच्या उद्घाटनामुळे भाजपकडे आता मोठा मुद्दा आहे. या निवडणुकीअगोदर राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. भाजप या जागांवर भक्कम उमेदवार देत आहे, जेणेकरून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल. अशातच भाजपने गुजरातमधील राज्यसभेच्या जागेसाठी सुरतमधील बड्या व्यापाऱ्याला उमेदवारी दिली आहे. कोण आहेत जाणून घ्या.
भाजपने देशतील डायमंट सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरत शहरामधील हिरे उद्योगपती गोविंद भाई ढोलकिया यांना उमेदवारी दिली आहे. गोविंद भाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रूपयांची देणगी दिली होती. गोविंदभाई ढोलकिया 74 वर्षांचे असून ते सहावी शिकलेले आहेत. राजकारणात किंवा राज्यसभेवर जाईल असं मला कधीट वाटलं नव्हतं, असं गोविंदभाई ढोलकिया म्हणाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंदभाई ढोलकिया यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
गोविंदभाई ढोलकिया यांची एकूण मालमत्ता 4,800 कोटी रूपये आहे. गोविंदभाई ढोलकिया यांची कंपनी थायलंड, हाँगकाँग, अमेरिका आणि जपान य देशांमध्ये हिरे निर्यात करते. त्यासोबतच त्यांच्या कंपनीचे आर्क्टिक कॅनेडियन डायमंड कंपनी लिमिटेड आणि रिओ टिंटो यांच्याशी करार आहेत.
दरम्यान, गोविंदभाई ढोलकिया यांच्या कंपनीमध्ये एकूण सहा हजारांपेक्षा जास्त लोक काम करतात. दिवसेंदिवस कामगारांच्याही संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या कंपनीचा 2021-22 मधील टर्न ओव्हर 16,000 कोटी होता. या कंपनीजे प्रमुख ग्राहक आहेत त्यामध्ये तनिष्क आणि डी बिअर्ससारख्या मोठ्या कंपन्यांच समावेश आहे.