डॉ.बाबासाहेबांवरुन विरोधी पक्षांनी घेरल्यानंतर भाजपा एक्टीव मोडवर, शाह यांनी बोलावली हाय लेव्हल मिटींग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षही एक्टीव मोडमध्ये आला आहे. विरोधकांची रणनिती मोडून काढण्यासाठी अमित शाह यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

डॉ.बाबासाहेबांवरुन विरोधी पक्षांनी घेरल्यानंतर भाजपा एक्टीव मोडवर, शाह यांनी बोलावली हाय लेव्हल मिटींग
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 2:19 PM

राज्यसभेत घटनेवरील चर्चे दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यावरील वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने हंगामा केला. त्यानंतर भाजपा एक्टीव मोडवर गेली आहे. या संदर्भात भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे. त्यानंतर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील कार्यालयात बैठक सुरु असून या बैठकीला भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.

संविधानावर संसदेत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान उत्तर  देताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेबांबद्दल कथित उद्गार काढले आहेत. सूत्रांच्या मते डॉ. बाबासाहेबांसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास करुन ते मांडण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी राजकीय भूमिका घेतल्याने भाजपा एक्टीव मोडवर गेली आहे. भाजपाने तातडीने विरोधकांची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीला भाजपा नेते जेपी नड्डा देखील पोहचले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात देखील बैठक सुरु झाली असून त्यातकाँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी देखील पोहचले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

मंगळवारी १७ डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला चांगलेच घेरले. त्यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस आता आंबडेकर, आंबेडकर असा घोषा लावत आहे. एवढे जप जर देवाचा केला असता तर स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. शाह पुढे म्हणाले की काँग्रेसला आंबेडकर यांचे नाव घेण्याची जास्त गरज आहे. परंतू जनतेला त्यांचा खरा इरादा माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने आंबेडकर यांचा अपमान म्हटले आहे. मल्लिकार्जून खरगे यांच्यापासून राहुल गांधीपर्यंत सर्वांनी या मुद्द्याला उचलले आणि हा दलितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शाह यांचे वक्तव्य आणि संपूर्ण प्रकरणाला राहुल गांधी यांनी मनुस्मृती आणि आरएसएसशी जोडले आहे.

संसदेत गोंधळ

अमित शाह यांच्या कथित वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार हंगामा झाला . मल्लिकार्जून खरगे यांनी आंबेडकर यांच्या अपमानाबद्दल अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. शाह यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. लोकसभेत देखील यावरुन जोरदार गोंधळ झाला आहे. त्यानंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. काँग्रेस आणि विरोधी गटाच्या खासदारांनी संसदेच्या डॉ.बाबासाहेब यांची छायाचित्रे घेऊन निदर्शने केली आहेत.

सरकार फ्रंटफूटवर

या संपूर्ण प्रकरणात सरकारने माघार न घेता फ्रंटफूटवर जात विरोधकांना उत्तर दिले आहे. राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी काँग्रेस या संपूर्ण प्रकरणात ड्रामेबाजी करीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपा डॉ.बाबासाहेबांचा आदर करते हे संपूर्ण देशाला माहिती आहे. परंतू संसदेतील गृहमंत्री अमित शाह यांच्या छोट्या क्लीपचा आधार घेत त्यांचे वक्तव्य अर्धवट सादर करुन गैरसमज पसरवला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या या ड्रामेबाजी आणि नौटंकीचा आपण निषेध करत आहोत असे किरेन रिजीजू यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील काँग्रेसची घेराबंदी केली असून काँग्रेसकडून उत्तर मागितले आहे.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.