घामातून शेतकऱ्यांनी पिकवले मोती..भाजपने अन्नधात्यांचा नाही ठेवला मान..
भाजपला या सत्तेत बाजूला करुन आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करू असा विश्वास शरद पवारांनी दिला.
हरियाणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Bihar CM Nitish Kumar) हरियाणातील फतेहाबादमध्ये विरोधकांची मोट बांधत भाजपवर जोरदार निशाणा साधला. या सभेसाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी उपस्थित लावत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले अश्वासन अद्याप पूर्ण करणयात आले नाही.
ज्या शेतकऱ्यांना अश्वासन देण्यात आले त्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या भाजप सरकारने केले असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.
Farmers held a protest on Delhi’s borders for a year but the govt didn’t take any steps to solve their problems. Farmers were promised that MSP will be provided but it was not given.Govt promised to withdraw cases registered against farmers but didn’t fulfil it: NCP chief S Pawar https://t.co/u86NucPqa8 pic.twitter.com/jf8hKgWrV6
— ANI (@ANI) September 25, 2022
या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, एक काळ असा होता की देशात अन्नधान्य नव्हते. त्यावेळी शेतकऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून देशातील ही परिस्थिती बदलली.
जगात अन्नधान्य उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यामागे केवळ आपल्या शेतकऱ्यांचीच मेहनत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांविषय बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही त्यानी भाष्य केले. देशातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील एका शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले की, मी बँकेकडून कर्ज घेतले होते.
मात्र आता मी बँकेचे कर्ज फेडू शकत नाही, आणि सरकारनेही माझे कर्ज माफ केले नाही. त्यामुळे मला आत्महत्या करण्यास भाग पडले असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर त्यांनी बोट ठेवले.
शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोलताना म्हणाले की, यानिमित्ताने मी शेतकऱ्यांना वचन देतो की, कर्जबाजारीपणामुळे एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही सर्व मिळून या सरकारमध्ये बदल घडवून आणू शकतो.
भाजपला या सत्तेत बाजूला करुन आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी दिला.
आज देशावर महागाईचे,बेरोजगारीचे संकट आहे, पण त्याकडे हे सरकार जाणीवपूर्वक लक्ष कोणी देत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त रविवारी हरियाणातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. हरियाणातील ओमप्रकाश चौटाला यांनी या नेत्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल आणि सीपीआयएम नेते सीताराम येचुरी यांची उपस्थिती होती.