“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील आधीच्या वीज प्रश्नावरुन विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

आली-आली-आली, गेली-गेली-गेली, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 6:13 PM

पाटणा : बिहार निवडणूक पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा आज (26 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार राजकीय भाषणं होत आहेत. त्यातच आता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील आधीच्या वीज प्रश्नावरुन विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. माझं शिक्षण बिहारमध्येच झालं आहे. तेव्हा 2 तास वीज असली तरी आम्ही म्हणायचो आली, आली, आली आणि तेवढ्यात लाईट जायची, असं जे. पी. नड्डा म्हणाले. ते बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित सभेत बोलत होते (BJP president JP Nadda criticize lalu Prasad Yadav over electricity condition).

बिहारमधील वीज पुरवठ्याबाबत बोलताना जे. पी. नड्डा यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “‘मी बिहारमध्ये शिकलो आहे. तेव्हा दोन तास जरी वीज आली तरी आम्ही लोक म्हणायचो ‘आली…आली…आली… आणि असं म्हणतो ना म्हणतो तोच गेली…गेली…गेली. तेव्हा 24 तास वीज हा विचारही कुणी करु शकत नव्हतं.”

“15 वर्षांआधी बिहारमध्ये कोणतीही निवडणूक आली की जाती, धर्माची चर्चा व्हायची, समाजाला विभाजित करण्याच्या गोष्टी केल्या जायच्या. आताच्या निवडणुकीत मात्र आमचे उमेदवार विकासाच्या गोष्टी करत आहेत. सरकारच्या कामाची माहिती देतात. हा मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी राजकारणाचा चेहराच बदलला आहे,” असंही नड्डा म्हणाले.

हेही वाचा : 19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल

अराजकतावाले नोकऱ्या कशा देणार?

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलेल्या नोकरीच्या आश्वासनावर टीका करताना नड्डा म्हणाले, “जे आज नोकरीचं आश्वासन देत आहेत ते बिहारमध्ये अराजकता पसरवणारे लोक आहेत. हे तर जे नोकरी करतात त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेणारे आहेत. गोपालगंजच्या दलित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पाटण्याला जात असताना गाडीच्या खाली उतरवून हत्या करण्यात आली इतपर्यंत अराजकता पोहचली होती. तेव्हा मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव होते. आज पोलीस महासंचालक आहेत ते तेव्हा पोलीस अधीक्षक होते. तेव्हा त्यांच्यांवर शहाबुद्दीनने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, आता नितीश सरकारमध्ये शहाबुद्दीन तुरुंगात आहे.”

बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 जागांवर मतदान होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभांचा आणि भाषणांचा चांगलाच जोर होता.

हेही वाचा :

तेज प्रतापांकडे 15 लाखांची बाईक, राजद नेत्याकडे एक किलो सोनं, बिहारच्या उमेदवारांची डोळे विस्फारणारी संपत्ती

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

भाजपची सरकारे नसलेल्यांनी पुतीनकडून लस मागवायची का? शिवसेनेचा सवाल

BJP president JP Nadda criticize lalu Prasad Yadav over electricity condition

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.