Rahul Gandhi : राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत भाजपने घेरलं काँग्रेसला, म्हणाले : राजकारण करताना असेच होते
व्हिडिओ शेअर करताना भाजप नेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, '2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधीही नाईट क्लबमध्ये होते. आज त्यांच्या पक्षात गदारोळ सुरू असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. त्यांचे हे सातत्य सुरूच आहे.
नवी दिल्ली : सध्या देशाच्या राजकारणात धर्माच्या दृविकरणावरून राजकारण चांगलेच तापलेले असताना भाजपकडून काँग्रेसला (Congress) घेरलं जात आहे. तसेच मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाना ही भाजपकडून (BJP) साधला जात आहे. तर याच्याआधीही राहुल गांधी यांचा नेपाळमधील एका पबमधील व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. आणि त्यावरून काँग्रेसला घेरत राहुल गांधींच्या कृतीवर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपला काँग्रेस आणि राहुल गांधींवर (Congress leader Rahul Gandhi) हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. हा व्हिडिओ भाजपचे सोशल मीडिया विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी हे तेलंगणातील काँग्रेस नेत्यांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी राज्यात सध्या काय चालले आहे आणि त्यांना आपल्या भाषणात काय म्हणायचे आहे असा सवाल केला.
भाजपचे सोशल मीडिया विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘राहुल गांधी तेलंगणातील रॅलीपूर्वी एका सभेत काँग्रेस नेत्यांना विचारतात, थीम काय आहे, काय बोलावे? खाजगी परदेश दौरे आणि नाईटक्लबिंग यामध्ये राजकारण करताना असेच घडते.
राहुल गांधी यांचा व्हिडिओ येथे पहा
Yesterday, Rahul Gandhi before his rally in Telangana, supposedly in solidarity with farmers, asks what is the theme, क्या बोलना है! ?♂️
This is what happens when you do politics in between personal foreign trips and nightclubbing…
Such exaggerated sense of entitlement. pic.twitter.com/NdRBDlGNK3
— Amit Malviya (@amitmalviya) May 7, 2022
याआधीही ‘नाइट क्लब’चा एक व्हिडिओ शेअर
अमित मालवीय यांनी यापूर्वी राहुल गांधींच्या ‘नाइट क्लब’चा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये राहुल गांधी पार्टी करताना दिसत होते. व्हिडिओ शेअर करताना भाजप नेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधीही नाईट क्लबमध्ये होते. आज त्यांच्या पक्षात गदारोळ सुरू असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. त्यांचे हे सातत्य सुरूच आहे. उत्सुकतेची बाब म्हणजे काँग्रेसने आपल्या अध्यक्षांना आउटसोर्स करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले होते
यानंतर हे प्रकरण वाढले आणि काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना म्हटले की, राहुल गांधी एका खाजगी विवाह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेले होते. निमंत्रणाशिवाय तिथे ते गेले नाहीत असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या लग्नाला उपस्थित राहणे हा काही गुन्हा नाही. येथे काँग्रेस नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आणि सांगितले की, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाला उपस्थित राहणे हा गुन्हा नाही कारण हा संघाच्या विपरीत आमच्या संस्कृतीचा भाग आहे.