नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendr Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस (Brithday) आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून तामिळनाडूमध्ये नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे.
याबरोबरच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमार्फत 720 किलो मासळी वाटप केली जाणार आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपकडून चेन्नईतील आरएसएस रुग्णालयाची निवड केली आहे.
या रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत 5 हजार रुपये असणार आहे.
नवजात बालकांना सोन्याची अंगठी वाटप केले जाण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 720 किलोग्रॅम मासळी वाटली जाणार आहे.
यावेळी मंत्री मुरुगन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.
नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.