Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश

मागील 18 महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपने फेसबुक जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केला आहे (Largest advertiser on Facebook in India).

Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 6:06 PM

नवी दिल्ली : फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणाऱ्यांविषयी नवी आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, मागील 18 महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपने फेसबुक जाहिरातीवर सर्वाधिक खर्च केला आहे (Largest advertiser on Facebook in India). यात सामाजिक, राजकीय आणि निवडणूक प्रचार इत्यादी जाहिरातींचा समावेश आहे. फेब्रुवारी 2019 पासून भाजपने फेसबुक जाहिरातीवर 4.61 कोटी रुपये खर्च केले आहेत.

फेसबुकवर जाहिरातीसाठी खर्च करणाऱ्यांच्या यादीत भाजपनंतर इतर पक्षांचंही नाव आहे. देशाचा सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने फेसबुक जाहिरातीवर 1.84 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर आम आदमी पक्षाने (AAP) फेसबुक जाहिरातीवर 69 लाख रुपयांचा खर्च केला आहे. सोशल मीडियावर जाहितीवर खर्च करणाऱ्यांच्या माहितीचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यावर 24 ऑगस्टपर्यंतचे आकडेवारी उपलब्ध आहे. आ आकडेवारीनुसार फेसबुक इंडियावर फेब्रुवारी 2019 पासून 59.65 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा : ‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र

टॉप 10 पैकी 4 जाहिरातदार भाजपशी संबंधित

ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकवर जाहिरातीवर खर्च करणारे टॉप 10 पैकी 4 जाहिरातदार भाजपशी संबंधित आहेत. यामध्ये 3 जण असे आहेत ज्यांचा पत्ता भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचा आहे. या चार पैकी जाहिरात देणारे दोन जाहिरातदार कम्युनिटी पेज आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी को’ आणि ‘भारत के मन की बात’ अशी या पेजची नावं आहेत. ‘मेरा पहला वोट मोदी’च्या जाहिरातीवर 1.39 कोटी रुपये आणि ‘भारत के मन की बात’च्या जाहिरातीवर 2.24 कोटी रुपए खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा : ‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

न्यूज आणि मीडिया वेबसाईट या श्रेणीत असलेल्या Nation with Namo पेजच्या जाहिरातीसाठी 1.28 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय माजी खासदार आणि भाजप नेते आर. के. सिन्हा यांच्याशी संबंधित एका पेजच्या जाहिरातीवर 65 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची बाबही या आकडेवारीत समोर आली आहे.

भाजपशी संबंधित या सर्व पेजच्या जाहिरातींची एकूण बेरीज केली तर हा खर्च 10.17 कोटी रुपये इतका आहे. ही किंमत फेसबुकच्या टॉप 10 जाहिरातदारांच्या एकूण वाट्यापैकी 64 टक्के इतकी मोठी आहे. या जाहिरातींमध्ये एप्रिल-मे 2019 च्या निवडणुकीत केलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमतासह सत्तेत आली होती.

संबंधित बातम्या :

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?

फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड

Largest advertiser on Facebook in India

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.