निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपने 50चा आकडाही गाठला नसता: ममता बॅनर्जी

मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. | Mamata Banerjee

निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपने 50चा आकडाही गाठला नसता: ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 8:47 AM

कोलकाता: निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं. निवडणूक आयोगाची एकंदरित वागणूकच भयंकर होती, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. (BJP wouldn’t have crossed even 50 seats without EC’s help says Mamata Banerjee)

‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात भाष्य केले. तृणमूल काँग्रेसची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास होता. मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

‘काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली’

पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करण्यात आली. तर काही ठिकाणी पोस्टल बॅलेटस् रद्द ठरवण्यात आली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र, मी बंगालच्या लोकांना सलाम करते. त्यांनी फक्त पश्चिम बंगालच नव्हे तर संपूर्ण देशाला वाचवल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

नंदीग्राम मतदारसंघातील पराभवाबद्दल ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

नंदीग्राम मतदारसंघात माझा अजून पराभव झालेला नाही. आम्ही त्याठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्याठिकाणी काही फेरफार करण्यात आले आहेत. मतदानाच्यादिवशीही मी नंदीग्राममध्ये एका मतदान केंद्राबाहेर तीन तास बसून होते. कारण त्याठिकाणी लोकांना मतदान करुन दिले जात नव्हते. मात्र, नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी न्यायालयात जाणार का, याविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

संबंधित बातम्या: 

“जनतेने दिलेला कौल स्वीकारायला हवा होता, हा तर रडीचा डाव”, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…

(BJP wouldn’t have crossed even 50 seats without EC’s help says Mamata Banerjee)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.