चेन्नई : एकीकडे कोरोनाच्या संकटाचे सावट असतानाच तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. केमिकल फॅक्टरीत अचानक बॉयलरचा स्फोट झाला, त्यानंतर अमोनिया गॅसची गळती झाली. या दुर्घटनेत एका महिलेसह चार मजूरांचा मृत्यू झाला, तर अन्य 10 मजूर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. गॅस गळती झाल्यामुळे आगीचा भडका उडाला, त्यात मजूरांना प्राण गमवावे लागले. (Boiler blast at a chemical factory in Tamil Nadu; 4 laborers killed, 10 injured, including a woman)
दुर्घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही यंत्रणांनी संयुक्तरित्या बचाव मोहिम हाती घेत आग विझवण्याचे कार्य सुरू केले. तसेच आगीत गंभीररित्या होरपळलेल्या मजूरांना तातडीने रुग्णालयात हलवले. फॅक्टरीत अडकलेल्या इतर मजूरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. फॅक्टरीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठा स्फोट होऊन बॉयलर फुटला, असे परिसरातील नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
फॅक्टरीत पिकांचे किडीपासून संरक्षण करणारे किटकनाशक तयार केले जाते. बॉयलर फुटल्यानंतर त्यातून अत्यंत विषारी स्वरुपाच्या अमोनिया गॅसची गळती सुरू झाली होती. यात चौघा मजूरांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची चौकशी केली जात आहे. प्रथमदर्शनी फॅक्टरीच्या संचालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे कडलूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री अभिनव यांनी सांगितले. राज्याचे कामगार मंत्री सी. व्ही. गणेशन यांनीही दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत कंपनी तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच सर्व मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन-तीन लाख रुपये आणि सर्व जखमींना प्रत्येकी एक-एक लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचा आणि जखमींना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचा आदेश कडलूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिला आहे. लॉकडाऊन काळात रोजगारावर गदा आली आहे. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणार्या सर्वसामान्य मजूरांवर काळाने अशाप्रकारे घाला केल्याने तामिळनाडूसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Boiler blast at a chemical factory in Tamil Nadu; 4 laborers killed, 10 injured, including a woman)
Video : Plastic Road in India | प्लास्टिक पासून बनत आहेत रस्ते, कसा असतो प्लॅस्टिकपासून बनलेला रस्ता?#PlasticRoadinIndia pic.twitter.com/B2BM4ravq9
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2021
इतर बातम्या
दुप्पट पैसे घ्या पण वेगवान इंटरनेट द्या! 5G वापरण्यासाठी भारतीय उत्सुक