Breaking : शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात नवनीत राणांची तक्रार, संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा आरोप!

संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

Breaking : शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात नवनीत राणांची तक्रार, संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा आरोप!
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 10:12 PM

नवी दिल्ली : परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद आज लोकसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे खासदार गिरीश बाटप आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. (MP Navneet Rana’s complaint against MP Arvind Sawant to Lok Sabha Speaker)

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपासह अनेक आरोपांचा समावेश आहे.

नवनीत राणा यांची तक्रार काय?

महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे प्रकरण, तसंच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते, असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

नवनीत राणा यांची तक्रार

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

संसदेत गिरीश बापट, नवनीत राणा आक्रमक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. सिंग यांचे आरोप गंभीर असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली. तर, ठाकरे सरकाच्या बचावासाठी पंजाबच्या काँग्रेस खासदाराने जोरदार बॅटिंग करत भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिलं.

लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. भाजपचे खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा हे लोकसभेत आक्रमक झाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाह्यचे, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. गिरीश बापट यांनी लोकसभेत संपूर्ण भाषण मराठीत करत ही मागणी केली.

संबंधित बातम्या : 

लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात

परमबीर सिंगांचा दुसरा मोठा दावा, रश्मी शुक्लांनीही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती!

MP Navneet Rana’s complaint against MP Arvind Sawant to Lok Sabha Speaker

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.