DJ च्या गाण्यामुळे लग्नच झालं कॅन्सल, वधूने लग्नचं मोडलं… नेमकं काय झालं ?

वाजतगात वरात आली होती, थोड्याच वेळात लग्न लागणार होतं. पण तेवढ्यात असं काही झालं की भरमंडपातच लग्न मोडलं. एका कृतीमुळे वधूने ते लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. तिला सर्वांनी समजावण्याचाही प्रयत्न केला, पण तिने कोणाचही ऐकलं नाही. असं काय झालं त्या लग्नात...

DJ च्या गाण्यामुळे लग्नच झालं कॅन्सल, वधूने लग्नचं मोडलं... नेमकं काय झालं ?
डीजेच्या गाण्यामुळे लग्नचं मोडलंImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 9:18 AM

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक अजब प्रकरण समोर यआलं आहे. तिथे डीजेच्या गाण्यावर वरातीतले लोक नाचत होते, मात्र अचानक असं काही घडलं की ते एकमेकांसोबतच भिडले. वरीतसोबत आलेल्या पाहुण्यांनी डीजेला एक गाणं वाजवायला सांगितलं, पण डीजेने ते गाणं वाजवलं नाही तेव्हा वरातीतल्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. घरातल्या लोकांशीची ते भिडले. वाद सुरू झाला. जिथे लग्न लागणार होतं तिथेच यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. मात्र वधूला ही गोष्ट समजताच तिने जो निर्णय घेतला त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वधूने ते लग्नच मोडण्याचं ठरवलं आणि वराला त्याची वरात परत घेऊन जाण्यास सांगितलं.

तिचा निर्णय ऐकून घरातलेही हैराण झाले, सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण वधू तिच्या निर्णयावर ठाम होती, तिने लग्न करण्यास थेट नकार दिला. हे सगळं अजब प्रकरण निगोहा येथील भद्दी खेडा गावातील आहे. तेथे 25 नोव्हेंबर रोजी रायबरेलीच्या बछरांवा इचौली गावातून लग्नाची वरात आली होती. वधू छान तयार होऊन तिच्या वराची वाट पहात होती. मात्र तेवढ्यात वरातीमध्ये डीजेवरून गाण वाजवण्याच्या मुद्यावरून वाद झाला.

वराच्या जीजूंची डिमांड

मिळालेल्या माहितीनुसार, वराचा जीजूही त्याच्या लग्नाच्या वरातीत सामील होऊन नाचत होता, धमाल करत होता. त्याने डीजेला त्याच्या आवडीचं एक गाणं वाजवण्यास सांगितलं, पण डीजेवाल्याने काही ते गाणं वाजवलं नाही. फक्त माझ्या आवडीचंच गाण वाजेल असं उत्तर त्याने दिलं. हे पाहून वधूकडच्या लोकांनीही वराच्या जीजाजींना विरोधा केला आणि एवढ्याशा मुद्यावरूनच दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, दोन्ही पक्षातील लोकांपैकी अनेक जण जखमी झाले.

वधूने घेतला असा निर्णय

अखेर थोड्या वेळाने हे प्रकरण शांत झालं. पण वधूला या सगळ्या वादाबद्दल, मारामारीबद्दल समजताच तीसुद्धा नाराज झाला. छोट्याशा मुद्यावरून वराकडच्या लोकांनी असा वाद घातल्याने तिला वाईट वाटलं आणि तिने थेट लग्न न करण्याचाच निर्णय घेतला. मात्र तिचं बोलणं ऐकून सर्वच जण हैराण झाले. लग्न मोडू नकोस असं सांगत अनेकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. घरातील मोठ्या, वडिलधाऱ्या मंडळींनीही तिची समजूत घातली, मात्र वधू तर कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. छोट्याशा गोष्टीवरून ज्या घरात प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचतं, अशा घरात मी काही जाणार नाही असे सांगत ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर तिच्या निर्णयानंतर नवरा मुलगा हाँ वधूला सोबत न घेताच वरात घेऊन परतला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.