ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक

तेलंगणात लग्नामध्ये वधू आणि वरपक्षातील शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक
Follow us
| Updated on: Nov 03, 2019 | 10:21 AM

हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये राडा (Bride & Groom’s Families Fight) झाल्याचं पाहायला मिळालं. शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत.

तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला. कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या

शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक (Bride & Groom’s Families Fight) पोलिस स्टेशनमध्ये आले.

अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.