कुस्तीपटू आणखी आक्रमक, आता आंदोलन इंडिया गेटकडे; ब्रिजभूषण यांच्या त्या विधानाचा घेतला समाचार…
ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीवरून कुस्तीपटू मंगळवारी जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढला आहे तर ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या हा परफॉर्मन्सवरूनही त्यांनी टीका केली आहे.
नवी दिल्ली : भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला आहे. 23 एप्रिलपासून सुरू असलेले हे निदर्शन आता जंतरमंतर सोडून इंडिया गेटवर पोहोचले असल्याने याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तरीही ब्रिजभूषण सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. काल केलेल्या विधानानंतर ब्रिजभूषण यांनी आता महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मंथरा म्हटले आहे, ज्याला बजरंग पुनिया यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
ब्रिजभूषण यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात विनेश फोगटची तुलना मंथराशी केली होती आणि सांगितले होते की, मंथरा आणि कैकेयीने काही भूमिका केल्या होत्या त्याप्रमाणे विनेश फोगट माझ्यासाठी मंथरा म्हणून आली आहे.
यावेळी विनेश फोगटवर टीका करत तिचेच आपण आभार मानत असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्रिजभूषण यांच्या या वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर देताना बजरंग पुनिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे की, हे काही पती-पत्नीचे आंदोलन नसून देशातील हजारो कुस्तीपटूंचे निदर्शनं असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिजभूषण यांच्या टीकेला उत्तर देताना आता त्यांना पुन्हा कँडल मार्चमधून उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुस्तीपटूंची नार्को टेस्ट करण्याच्या आव्हानाला उत्तर देताना पुनिया यांनी सांगितले की, भारतीय कायदा महिला तक्रारदारांच्या नार्को टेस्टला परवानगी देत नाही.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी मागितली तर आम्ही ती करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. .
ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीवरून कुस्तीपटू मंगळवारी जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढला आहे तर ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंच्या हा परफॉर्मन्सवरूनही त्यांनी टीका केली आहे.
दरम्यान, पैलवानांच्या कँडल मार्चप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थाही मजबूत केली आहे. या मोर्चात आणखी 500 आंदोलक सहभागी होऊ शकतात, असा अंदाजही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे.
आंदोलकांना इंडिया गेटपर्यंत घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी वाहनांची व्यवस्था केली आहे.जंतरमंतरवर काढलेल्या कँडल मार्चला पोलिसांनी आंदोलकांना अधिकृत परवानगी दिली नाही किंवा नाकारलीही नाही. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले.