राज ठाकरेंना अयोध्या बंदी करणाऱ्या बृजभूषण सिंह यांची मुंबईत सभा?; मनसे काय करणार?
राज्यातील हिंदुत्वाचा चेहरा ठरलेले राज ठाकरे यांना विरोध करणारे खा. बृजभूषण सिंह जर मुंबईत प्रचारासाठी आले आणि मनसेच्या नाकावर टिच्चून सभा ही घेतली तर मनसे काय करेल असा सवाल राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
मुंबई : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापवलेले मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी आपण अयोध्या दौरा करणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) यांनी त्याला जोरदार विरोध केला. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. तसेच ही राज ठाकरे यांची धार्मिक यात्रा नाही, तर राजकीय यात्रा आहे. श्रीरामाचं दर्शन करायला यायचं असेल तर माफी मागा, असेही ते बोलले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तुर्तास रद्द करत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी एक साधा खासदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना आव्हान देतो, कसं शक्य असल्याचा सवाल केला होता. तर आपल्याला आणि मनसैनिकांना फसविण्यासाठी हा ट्रॅप लावण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यातील मनसेनेत्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांची रसद खासदार बृजभूषण सिंह यांना असल्याचे म्हटले आणि त्यांचे 2018चे फोटो सोशल मेडियावर टाकले होते. त्याला आमदार रोहीत पवार यांनी उत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका करत राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करा असा सल्ला दिला होता. तसेच खासदार बृजभूषण राज्यात येऊन मुंबईत सभा घेतील असे सुतोवाच केले होते. त्यामुळे असे झाल्यास मनसे काय करानार असा सवाल उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांच्याविरोधात राण उठवले
राज्यात हिंदुत्वाचा मुद्दाला हात घालत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून हल्ला करत राज सरकारला अल्टीमेट दिला होता. तसेच जेव्हा भोंग्यावरून आजान दिली जाईल तेव्हा आम्ही हनुमान चालिसा लावू असे म्हटले होते. त्यामुळे राज्यातील राजकारण आणि समाजकारण चांगलेच तापले होते. तर हा मुद्दा देशातील इतर राज्यातही पसरला होता. देशातील वातावरण चांगलेच गरम झालेले असताना राट ठाकरे यांनी आपण अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे घोषीत केले आणि तेथेच माशी शिंकली. उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी भाजपला न जुमानता राज ठाकरे यांच्याविरोधात रान उठवले आणि जो पर्यंत ते उत्तर भारतीय जनतेची माफी मागत नाहीत तो पर्यंत इकडे पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा, असंही मी बोललो. त्यानंतर योगींची माफी मागण्यासही सांगितलं.
खासदार बृजभूषण सिंह यांना रसद शरद पवार यांची
दरम्यान वाढणाऱ्या विरोधामुळे आणि होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणूकांमुळे राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशच्या पैलवानाला नक्की कोणाची फुस आहे. जो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट आव्हान देतो, हे शक्य आहे का?” असा प्रश्न केला होता. तसेच या शडयंत्राच्यामागे त्यामागचे ते चेहरे कोण आहेत, हे मला माहिती असूनही बोलता येणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मात्र मनसेने थेट समोर येत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला करत खासदार बृजभूषण सिंह यांना रसद आणि ताकद देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार करत असल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर त्यांनी 2018 मधील फोटो खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांचे काही फोटो सोशल मेडियावर टाकले. त्याला राष्ट्रवादीकडून उत्तरे देण्यात आली होती.
राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी @mnsadhikrut ला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2022
आमदार रोहीत पवार
मनसेचत्या नेत्यांनी केलेल्या आरोपाला आणि त्या फोटोवरून आमदार रोहीत पवार यांनी मनसे नेत्यांवर हल्ला चठवला. तसेच त्यांनी राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये. असे म्हटले होते.
खा. बृजभूषण सिंह मुंबईत प्रचाराला येणार
आमदार रोहीत पवार यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे, उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे यांना विरोध करणारे खा. बृजभूषण सिंह मुंबईत प्रचाराला येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ते भाजपचे असल्याने मुंबईत असणारे उत्तर भारतीयांचा ते वोट कार्ट म्हणून भाजपसाठी बाहेर काढू शकतील असेही उत्तर प्रदेशमधील नेत्यांना वाटत असाव. तर होणारी निवडणूक लक्षात घेऊन खा. बृजभूषण सिंह यांना मुंबईत प्रचारालाही पाठवू जाऊ शकते असा तर्क लावला जात आहे.
मुंबईत प्रचाराला खा. बृजभूषण सिंह आले तर
राज्यातील हिंदुत्वाचा चेहरा ठरलेले राज ठाकरे यांना विरोध करणारे खा. बृजभूषण सिंह जर मुंबईत प्रचारासाठी आले आणि मनसेच्या नाकावर टिच्चून सभा ही घेतली तर मनसे काय करेल? आणि जर सभा झालीच तर मनसे त्यांच्या स्वरूपाप्रमाणे राज्याच खळखट्याक करणार का? जसे खा. बृजभूषण सिंह यांनी विरोध केला त्यापेक्षा कडवा विरोध मनसे त्यांना करणार का ? असा सवाल राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
राहिला प्रश्न आदरणीय @PawarSpeaks साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2022
आ. रोहीत पवारांच्या ट्वीटमध्ये असं काय होतं
राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये असे म्हटले होते. तसेच राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष. ते 2018 एका कार्यक्रमात एकत्र आले होते. तो तेव्हाचा आहे. तो ही एका स्पर्धेतील. तसेच मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल असं म्हटलं होतं.
मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2022