Gyanvapi Masjid Case: दुसऱ्या सर्वेक्षणाच्या अहवालात मोठा खुलासा; कमळ, डमरू, त्रिशूळ मिळाल्याचा दावा
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले होते. तीन दिवसांच्या पाहणीनंतर आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
वाराणसी: येथील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid)सर्वेक्षणाचा दुसरा अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आला. या दुसऱ्या रिपोर्टमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वेक्षणाच्या दुसऱ्या अहवालात (Gyanvapi Masjid Second Survey Report) मशिदीमध्ये सनातन धर्माशी संबंधित अनेक चिन्हे असल्याचे समोर आले आहे. मशिदीच्या आत कमळ, त्रिशूल आणि डमरूची चिन्हेही सापडल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. याशिवाय वाजुकुंडमध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाचाही (Shivling) उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. सहाय्यक न्यायालय आयुक्त अजय सिंह यांनी सांगितले की, अजय मिश्रा यांनी काल संध्याकाळी अहवाल सादर केला होता. त्यांनी बाहेरील भिंतींचे केलेले सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, अहवालात काय आहे, या प्रश्नावर अजय सिंह यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
➡️ज्ञानवापी मामले पर सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई
➡️प्रतिवादी पक्ष की मांग पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई
➡️ज्ञानवापी मामले में हिंदू सेना भी पक्षकार बनेगी
➡️SC ने हिंदू सेना को पक्षकार बनाने की इजाजत दी
➡️SC में हिंदू सेना के वकील वरुण सिन्हा पेश होंगे।#Gyanwapi #GyanvapiMosque pic.twitter.com/x0IGgHqHzA
— TV9 Uttar Pradesh (@TV9UttarPradesh) May 19, 2022
➡️पूर्व कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा ने 2 पेज की रिपोर्ट पेश की
➡️दीवार के पास देवी देवताओं की आकृति-रिपोर्ट
➡️हिंदू धर्म से जुड़े प्रतीक, मूर्तियों के अवशेष मिले-रिपोर्ट#GyanvapiMandir #Gyanwapi #GyanvapiMosque #Gyanvapi pic.twitter.com/GoqpsT76Cs
— TV9 Uttar Pradesh (@TV9UttarPradesh) May 19, 2022
भिंतींवर संस्कृतमध्ये श्लोक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मशिदीच्या आतील तळघराच्या भिंतीवर सनातन संस्कृतीची चिन्हे आढळून आल्याचे सर्वेक्षण अहवालात सांगण्यात आले आहे. स्त्रोतांवर विश्वास ठेवला तर, संस्कृत श्लोक देखील लिहिले गेल्याचे म्हटलं आहेत. याशिवाय सर्वेक्षणाच्या दुसऱ्या अहवालात शिवलिंगाचा उल्लेख ही करण्यात आला आहे. याशिवाय मशिदीच्या भिंतींवर कमळ, डमरू आणि त्रिशूळ ही चिन्हे मिळाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले होते. तीन दिवसांच्या पाहणीनंतर आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी हिंदू पक्षाने दावा केला होता की, मशिदीच्या वाळूखान्यात शिवलिंग सापडले आहे. मुस्लिम बाजूने याचा इन्कार केला आणि त्याला कारंजा म्हटले.
पहिल्या पाहणीतही अनेक दावे
यापूर्वी न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी 6 आणि 7 मे रोजी सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाहणी अहवालात खंडित शिल्पे, देवतांच्या कलाकृती, कमळाच्या कलाकृती, शेषनाग कलाकृती, नागफणीच्या आकृती, भिंतीवरील माऊंट आणि दिवे यांचा पुरावा सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.