पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात मेट्रोचा विस्तार करणार- मुख्यमंत्री के चंद्रशेखर

| Updated on: Jun 23, 2023 | 7:23 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी हैदराबाद येथील हुसेन सागर बंधाऱ्यावर अमरज्योतीचे अनावरण केले. हुतात्मा स्मारकाचे अनावरण केल्यानंतर जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्र्यांनी तेलंगाणा राज्यासाठी लढणाऱ्या हौतात्म्यांचं स्मरणही केलं.

पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात मेट्रोचा विस्तार करणार- मुख्यमंत्री के चंद्रशेखर
Follow us on

हैदराबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे सांगितलं की की, येत्या निवडणुकीत बीआरएस सत्तेवर आल्यास मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार पाटनचेरू औद्योगिक क्षेत्रापर्यंत केला जाईल. पाटनचेरू येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी केल्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, तेलंगाणा सरकारच्या प्रयत्नांमुळे राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. ते म्हणाले की, राज्यातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही ही वस्तुस्थिती मान्य करत आहेत. आम्ही एकाच वेळी विकास आणि जनकल्याण साध्य केले आहे. राज्याने हाती घेतलेल्या योजना आणि कार्यक्रमांचे अनुकरण आता इतर अनेक राज्यांकडून केले जात आहे.

कार्यक्रमाच्या संकल्पना आणि योजनांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने राज्याचा विकास कसा साधला जात आहे, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरडोई उत्पन्नात आपण प्रथम क्रमांकावर आहोत. या गोष्टी आपल्याला देशात अव्वल स्थानावर आणत आहेत, असे ते म्हणाले. स्थानिक आमदार गुडेम महिपाल रेड्डी यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षात झालेल्या विकासाची माहिती दिली. पातनचेरूचा औद्योगिक पट्टा आता विकासाच्या आघाडीवर पुढे जात आहे, आणि अधिकाधिक विकास होण्याची आशा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार लवकरच हैदराबादमध्ये 5 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे.

अमर ज्योतीचे अनावरण

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी हैदराबाद येथील हुसेन सागर बंधाऱ्यावर अमरज्योतीचे अनावरण केले. हुतात्मा स्मारकाचे अनावरण केल्यानंतर जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्र्यांनी तेलंगाणा राज्यासाठी लढणाऱ्या हौतात्म्यांचे स्मरण केले. आपल्या तीस मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी तेलंगाणातील जनतेने चालवलेला आणि हाती घेतलेला राज्यत्वाचा लढा हा लोकशाही भारतातील दुर्मिळ संघर्षांपैकी एक असल्याचे सांगितले. केसीआर पुढे म्हणाले की, चळवळीच्या सुरुवातीच्या दिवसांची आखणी चळवळीच्या कार्यकर्तांनी काळजीपूर्वक केली होती. त्यावेळच्या तेलंगाणातील अल्प विकसित प्रदेशाच्या अंतर्गत भागात चळवळ नेण्याचे नियोजन होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तेलंगाणाच्या दुसऱ्या टप्प्यातील संघर्षाची योजना कशी राबवली आणि प्रत्यक्षात आणली याची सविस्तर माहिती दिली. राज्यसंग्रामातील हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

अमर ज्योतीचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि अनेक चळवळ समर्थकांच्या उपस्थितीत केले. मुख्य सचिव शांती कुमारी यांनी आपल्या भाषणात हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी तेलंगाणातील शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जातो.