बसपामध्ये आता ‘आकाश’राज; मायावती यांनी दिली भाच्याच्या हाती पक्षाची धुरा
उत्तरप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले आहे. पक्षाला अलीकडे झालेल्या निवडणूकांमधील पराजयानंतर मायावती यांनी पक्षाचे नेतृत्व आता नवीन पिढीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तरप्रदेश | 10 डिसेंबर 2023 : राजकारणी आणि उद्योजक आपल्या पुढील पिढीकडेच आपल्या वारशाची जबाबदारी सोपवत असतात. आता उत्तप प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या भाच्याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले आहे. रविवारी झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या ( बसपा ) बैठकीत पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांच्याकडे उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड वगळता उर्वरित भारतातील पक्षाची सूत्रं सोपविली आहेत. यापूर्वी मायावती यांनी त्यांचे भाचे आकाश आनंद यांना विधानसभा निवडणूकांची जबाबदारी सोपविली होती. परंतू पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही.
उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमत्री मायावती यांनी लखनऊ येथे पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक घेतली. या बैठकीत आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवित असल्याची घोषणा केली. मायावीत यांनी भाचे आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर करीत उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड सोडून उर्वरित संपूर्ण देशाची जबाबदारी सोपविली आहे.
धाकट्या भावाचा मुलगा
आकाश हे बसपा प्रमुख मायावती यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांचे पूत्र आहेत. आकाश यांनी लंडनच्या मोठ्या कॉलेजातून एमबीए केले आहे. सहा वर्षांपूर्वी 2017 च्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर मायावती यांनी सहारनपूरच्या रॅलीत आकाश यांची राजकीय वारस म्हणून प्रथमच जाहीर केले होते. गेल्याकाही वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवानंतर मायावती यांनी तरुण पिढीकडे पक्षाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून त्यांनी आपला भाचा आनंद यांना राजकारणात आणले आहे. मायावती यांनी आकाश यांनी पक्षातील पक्षातील अनेक पदे दिली आहे. एवढंच काय आकाश यांना निवडणूका असलेल्या राज्यातील प्रभारी देखील बनविले होते.
येथे पाहा ट्वीट –
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh | Bahujan Samaj Party (BSP) leader Udayveer Singh says, “BSP chief Mayawati has announced Akash Anand (Mayawati’s nephew) as her successor…” pic.twitter.com/nT1jmAMI29
— ANI (@ANI) December 10, 2023
निवडणूकांच्या तयारीला लागा
बसपामध्ये नवे नेतृत्व म्हणून वेगाने पुढे येत असलेल्या आकाश आनंद यांनी विधानसभा निवडणूकांपूर्वी राजस्थानातून प्रचार रॅली सुरु केली होती. या रॅलीला मायावतीने ‘बहुजन अधिकार यात्रा’ असे नाव दिले होते. बसपाच्या महत्वाच्या बैठकीनंतर पक्षाचे अन्य एक नेते उदयवीर सिंह यांनी संघटनेशी जोडलेल्या लोकांना लोकसभा निवडणूकांसाठी सज्ज राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. निवडणूकांची तयारी सुरु झाली असून आम्हाला प्रत्येकाला आपआपल्या क्षेत्रात जाऊन काम करण्यासाठी सांगितले आहे. आकाश यांना उत्तराधिकारी घोषीत करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी बहन मायावती यांच्या म्हणणे आहे की आपल्यानंतर आकाश पक्षाची धुरा सांभाळतील. ज्या राज्यात पार्टी कमजोर आहे. तेथे आकाश आनंद काम करतील. त्यांनी सांगितले की आकाश आनंद यांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळून अन्य राज्यात पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.